ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
दिगवळे सरपंच संतोष घाडीगांवकर यांचा भाजपात प्रवेश ; आमदार नितेश राणे यांच्या कार्यपध्दतीवर विश्वास असल्याचे केले स्पष्ट.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

दिगवळे सरपंच संतोष घाडीगांवकर यांचा भाजपात प्रवेश ; आमदार नितेश राणे यांच्या कार्यपध्दतीवर विश्वास असल्याचे केले स्पष्ट.

प्रकाशन: 31 Aug 2023 07:31 PM
वाचन संख्या 146

आमदार नितेश राणे यांनी केले स्वागत.

कणकवली | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातल्या दिगवळे गांवचे सरपंच संतोष घाडीगांवकर यांनी भाजपात प्रवेश केल्याने दिगवळेतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला धक्का बसला आहे. आमदार नितेश राणे यांची विकासकामे व गांवचा विकास हा आमदार नितेश राणे आणि भाजपा पक्ष यांच्याच माध्यमातून होऊ शकतो. या भूमिकेतून दिगवळेचे उबाठा सेनेचे सरपंच संतोष रामचंद्र घाडीगांवकर यांनी आमदार नितेश राणे, माजी जि. प. अध्यक्ष संदेश सावंत, संजना सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत कणकवलीतील ओम गणेश निवासस्थानी भाजपा पक्षात प्रवेश केला.

यावेळी संदेश उर्फ गोट्या सावंत माजी जि.प. अध्यक्ष, संजना संदेश सावंत माजी जि. प. अध्यक्ष, राजेश पवार ग्राम. सदस्य, अनुजा पवार ग्राम. सदस्य, रेश्मा खांडेकर ग्राम. सदस्य, मनिषा केरे ग्राम.सदस्य, संजना चव्हाण, हरिश्चंद्र परब, महेश पवार, गणेश कुबल, सतीश सावंत, संदीप चव्हाण, बाबू घाडी उपस्थित होते.

दरम्यान प्रवेशानंतर आपण गावतील विविध विकास कामे व गावच्या विकासाला चालना देणारी काम करणार असल्याचे सरपंच संतोष रामचंद्र घाडीगांवकर यांनी सांगितले. आमदार नितेश राणे यांच्या कार्यपध्दतीवर विश्वास असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स