ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
मालवणच्या सिंधुदुर्ग महाविद्यालयाचे प्राध्यापक लेफ्टनंट डॉ. एम. आर. खोत यांना सत्यशोधक अण्णा भाऊ साठे समाजभूषण पुरस्कार प्रदान.

मालवणच्या सिंधुदुर्ग महाविद्यालयाचे प्राध्यापक लेफ्टनंट डॉ. एम. आर. खोत यांना सत्यशोधक अण्णा भाऊ साठे समाजभूषण पुरस्कार प्रदान.

प्रकाशन: 27 Aug 2023 08:46 AM
वाचन संख्या 279

कोल्हापूरात संपन्न झाला पुरस्कार सोहळा.

मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण शहरातल्या स का पाटील सिंधुदुर्ग कॉलेजच्या एनसीसी विभागाचे प्रमुख तसेच व्यावसायिक अर्थशास्त्र विभागाचे प्रमुख असोसिएट एनसीसी ऑफिसर प्राध्यापक लेफ्टनंट प्रा डॉ एम आर खोत यांना काल २६ ऑगस्टला कोल्हापूर येथे ‘सत्यशोधक अण्णाभाऊ साठे परिषद, महाराष्ट्र’यांच्यावतीने ‘अण्णाभाऊ साठे समाजभूषण पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.

प्राध्यापक एम आर खोत मूळ गांव कोगनोळी कागल हे असून हे एका शेतकरी कुटुंबातील आहेत. लहानपणापासून त्यांनी शेतीची कामे करीत बारावीपर्यंत शिक्षण पूर्ण केले होते व त्यानंतर कोल्हापूर या ठिकाणी एका बुलडोजर कंपनीत क्लार्क आणि मॅनेजर म्हणून काम करीत असताना B.A., M.A., M.Phil. Ph.D . आणि GDC & A . अशा पदव्या प्राप्त केल्या. पीएचडी करत असताना शहाजी कॉलेज व महावीर कॉलेज कोल्हापूर या ठिकाणी तासिका तत्त्वावर बुलडोझर कंपनीतील नोकरी सांभाळत शिकवण्याची काम केले. त्यानंतर पिएचडी झाल्यानंतर मालवण मधील सिंधुदुर्ग कॉलेजवर सहाय्यक प्राध्यापक म्हणून रुजू झाले. कॉलेजला जॉईन झाल्यानंतर त्यांनी असोसिएट एनसीसी ऑफिसर pre. commissioner army course हा तीन महिन्याचा आर्मी कोर्स भारताचे मध्यवर्ती ट्रेनिंग सेंटर नागपूर कामठी या ठिकाणी पूर्ण केला. त्यांना लेफ्टनंट हे पद प्राप्त झाले . अलीकडच्या काळात त्यांनी MBA (ह्यूमन रिसोर्स मॅनेजमेंट) हा अभ्यासक्रम देखील पूर्ण केलेला आहे. तसेच चालू वर्षी फेब्रुवारी महिन्यात पुन्हा एक महिन्याचा आर्मी कोर्स पूर्ण करून आलेले आहेत .मुंबई युनिव्हर्सिटी व कॉलेज या ठिकाणी विविध समित्यांवर ते काम करतात.

कोल्हापूर या ठिकाणी देखील आपल्या मूळ गावी वेगवेगळ्या सामाजिक कार्यात ते सातत्याने सहभागी असतात. या सर्व गोष्टींचा विचार करून सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत असल्यामुळे त्यांना हा अण्णाभाऊ साठे समाजभूषण पुरस्कार जाहीर झालेला आहे. हा पुरस्कार सोहळा राज्यश्री शाहू सांस्कृतिक भवन दसरा चौक कोल्हापूर या ठिकाणी मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. या पुरस्काराबद्दल प्राध्यापक डाॅ. लेफ्टनंट खोत यांचे मालवण मधून अभिनंदन होत आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 295

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स