ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
मालवणात उद्या 'विज ग्राहक संघटना' अंतर्गत मालवण उपविभागीय विज ग्राहक समिती स्थापनेसाठी बैठकीचे आयोजन ; जिल्हा व्यापारी महासंघाच्या माध्यमातून संघटना आहे कार्यरत.

मालवणात उद्या 'विज ग्राहक संघटना' अंतर्गत मालवण उपविभागीय विज ग्राहक समिती स्थापनेसाठी बैठकीचे आयोजन ; जिल्हा व्यापारी महासंघाच्या माध्यमातून संघटना आहे कार्यरत.

प्रकाशन: 26 Aug 2023 12:59 PM
वाचन संख्या 82

विज समस्यांवर सनदशीर तोडगा काढणे हा संघटनेचा उद्देश ; इच्छुकांनी बैठकीला उपस्थित रहायचे आवाहन.

मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटनेच्या अंतर्गत महावितरणच्या मालवण उपविभागाची विज ग्राहक समिती स्थापन करण्यासाठीची आढावा बैठक उद्या रविवारी २७ ऑगस्टला मालवण -भरड येथील लिलांजली सभागृहात सायं.४.०० ते ५.३०या वेळात आयोजित करण्यात आली आहे. जिल्ह्यातील विज ग्राहकांच्या समस्यां महावितरणचे अधिकारी व लोकप्रतिनिधींच्या समन्वयाने सोडविण्यासाठी महाराष्ट्र राज्य विज ग्राहक संघटनेशी संलग्न असलेली ‘सिंधुदुर्ग जिल्हा विज ग्राहक संघटना’ व्यापारी महासंघाच्या माध्यमातून जिल्ह्यात कार्यरत आहे.

विज ग्राहक संघटने मार्फत जिल्ह्यातील सर्व तालुक्यांना उपविभाग निहाय भेट देऊन लोकांचे प्रश्न समजून घेऊन विजेच्या समस्यांबाबत आवाज उठविण्यासाठी प्रत्येक तालुक्यात ग्राहकांची संघटना स्थापन करीत आहे. या अनुषंगाने मालवण तालुक्यातील विजेबाबत विविध समस्या सोडविण्या संदर्भात पुढील रूप रेषा ठरविण्यासाठी व मालवण तालुका कार्यकारिणीची रितसर स्थापना करण्याच्या अनुषंगाने ही बैठक आयोजीत करण्यात येत आहे.

विजेच्या सततच्या भेडसावणाऱ्या विविध समस्यांवर तोडगा सनदशीर मार्गाने काढण्यासाठी संघटनेच्या माध्यमातून काम करू इच्छिणाऱ्या प्रत्येकाला या समितीत सहभागी होऊन आपले योगदान देता येईल व असे योगदान देवू इच्छिणाऱ्या सर्वांनी या बैठकीस उपस्थित राहावे असे आवाहन विज ग्राहक संघटना मालवण चे अस्थायी अध्यक्ष समिर म्हाडगूत,मालवण चे अस्थायी सचिव प्रशांत हिंदळेकर, जिल्हा अध्यक्ष श्रीराम शिरसाट, जिल्हा समन्वयक नंदन वेंगुर्लेकर व मालवण व्यापारी संघाचे अध्यक्ष श्री.उमेश नेरूरकर यांनी संयुक्तपणे केले आहे.

या बैठकीत मालवण विज ग्राहक संघटनेची कार्यकारीणी निवड करण्या बरोबरच मालवण तालुक्यातील वीज ग्राहकांना गणेश चतुर्थीला अखंडीत वीज पुरवठा होण्याच्या दृष्टीने संबंधीत वीज वितरण आधीकाऱ्यांशी चर्चा ही होणार आहे. त्याच बरोबर तालुक्यातील विजग्राहकांच्या विज पुरवठ्या संबंधी कोणत्याही तक्रारी असल्यास सर्व कागदपत्रांसह उपस्थित रहावे असे आवाहन समितीच्या वतीने करण्यात येत आहे

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स