ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
आज देवबागात महिलांसाठी नारळ लढविणे स्पर्धेचे आयोजन.

आज देवबागात महिलांसाठी नारळ लढविणे स्पर्धेचे आयोजन.

प्रकाशन: 26 Aug 2023 09:27 AM
वाचन संख्या 198

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, महिला आघाडी, युवती सेना आणि तालुका प्रमुख व स्थानिक माजी जि. प. सदस्य हरी खोबरेकर यांच्या संयुक्त विद्यमाने स्पर्धेचे आयोजन.

मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या देवबाग येथील ‘श्री. सिद्धिविनायक बीच होम स्टे’ येथे आज २६ ऑगस्टला दुपारी ३ वाजता नारळ लढविणे स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेत पहिले बक्षीस रुपये ३०००, दुसरे बक्षीस २०००, तिसरे बक्षीस १००० अशी ठेवण्यात आली आहेत. महिलांना व्यक्ततीकरणासाठी मंच, स्पर्धा व संधी देऊन समाजात संस्कृतीचा सक्षम जागर करणे अशा हेतूने ही स्पर्धा आयोजीत करण्यात आली आहे.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, महिला आघाडी, युवती सेना आणि तालुका प्रमुख व स्थानिक माजी जि. प. सदस्य हरी खोबरेकर यांच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

जास्तीत जास्त संस्कृती प्रेमींनी व नागरीकांनी या चुरशीच्या स्पर्धेला उपस्थित रहावे असे निमंत्रण आयोजकांनी दिले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स