आमदार वैभव नाईक यांनी राष्ट्रवादी काॅन्ग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची कोल्हापूरात घेतली सदिच्छा भेट.
कणकवली | प्रतिनिधी : आमदार वैभव नाईक यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे कोल्हापूर येथील पक्षाच्या सभेसाठी आले असता कोल्हापूर येथील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसमवेत श्री. शरद पवार यांची सदिच्छा भेट घेत त्यांचे स्वागत केले. यावेळी शरद पवार यांच्यासमवेत विविध विषयांवर चर्चा करत त्यांचे मार्गदर्शन घेण्यात आले.
यावेळी माजी मंत्री बंटी पाटील, माजी मंत्री जितेंद्र आव्हाड, श्रीनिवास पाटील, कोल्हापूर येथील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख विजय देवणे, जिल्हाप्रमुख संजय पवार, इंगवले आदी उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)