रामभाऊ परुळेकर कनिष्ठ महाविद्यालय मालवण सांघिक कॅरम स्पर्धेत अव्वल स्थानी.
मालवण/ प्रतिनिधी: मालवण क्रीडा व युवा संचलनालय,पुणे आणि जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग आयोजित दिनांक 18 ऑगस्ट http://localhost/news/public/uploads/2023 रोजी कट्टा याठिकाणी संपन्न झालेल्या कॅरम या क्रीडा प्रकारात स.का.पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय संलग्न रामभाऊ परुळेकर कनिष्ठ महाविद्यालयाचा कु.दत्ताराम प्रांत दाभोलकर व कु. करुण महेंद्र खोर्जे यांनी 19 वर्षाखालील मुलांच्या सांघिक कॅरम स्पर्धेत तालुका स्तरावर प्रथम क्रमांक पटकावला असून जिल्हा स्तरासाठी त्याची निवड करण्यात आली आहे. यशस्वी विद्यार्थ्यांचे महाविद्यालयाच्या वतीने प्राचार्य डॉ.शिवराम ठाकूर यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी कनिष्ठ महाविद्यालय समन्वयक व क्रीडा मार्गदर्शन प्रा.हसन खान,प्रा. मिलन सामंत, प्रा. अन्वेशा कदम, प्रा. हर्षदा धामापूरकर, प्रा. स्नेहा बर्वे व बहुसंख्येने विद्यार्थी उपस्थित होते.कृ.सी.देसाई शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष श्री.बाळासाहेब पंतवालावलकर व शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री. साईनाथ चव्हाण यांनी देखीख विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीत शुभेच्छा दिल्या.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)