ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
एक राखी सैनिकांसाठी...!; ओझर विद्यामंदिरचा उपक्रम!

एक राखी सैनिकांसाठी...!; ओझर विद्यामंदिरचा उपक्रम!

प्रकाशन: 19 Aug 2023 07:32 PM
वाचन संख्या 58

मालवण /सुयोग पंडित: मालवण तालुका उत्तर विभाग शिक्षण साहाय्यक समिती संचालित, ओझर विद्यामंदिर कांदळगाव या प्रशालेमध्ये ‘एक राखी सैनिकांसाठी’ हा उपक्रम राबवून देशाच्या रक्षणासाठी सदैव तत्पर असलेल्या जवानांना विद्यार्थिनींनी पोस्टाद्वारे राख्या पाठवून सैनिकांप्रती असलेला आदर द्विगुणीत केला. ओझर विद्यामंदिरच्या विद्यार्थिनींनी तयार केलेल्या राख्या भारतीय लष्कर प्रमुख अधिकारी, लष्कर मुख्यालय, श्रीनगर विभाग, जम्मू आणि काश्मीर सर्कल येथे पाठविण्यात आल्या. हा उपक्रम प्रशालेमध्ये दरवर्षी राबविण्यात येतो. सैनिकांना आपण प्रत्यक्ष भेटू शकत नाही; परंतु या उपक्रमातून सैनिकांना आत्मीयतेचा संदेश पाठवून सैनिकांबद्दल असलेले प्रेम आणि आदराची भावना व्यक्त करू शकतो. विद्यार्थ्यांच्या मनामध्ये देशप्रेम, राष्ट्रभक्ती, सर्वधर्मसमभाव इत्यादी भावना रुजू होण्यासाठी अशा प्रकारचे अनेक उपक्रम ओझर विद्यामंदिरमध्ये राबविण्यात येतात. ‘एक राखी सैनिकांसाठी’ हा उपक्रम प्रशालेमध्ये राबविण्यासाठी प्रशालेचे शिक्षक प्रवीण पारकर आणि सौ. एस. एस. बांदिवडेकर यांनी नियोजन करून विद्यार्थिनींना राख्या तयार करण्यासाठी मार्गदर्शन केले. ओझर विद्यामंदिरचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनीही या उपक्रमासाठी सहकार्य केले. शाळेमध्ये संस्कारक्षम उपक्रम राबविल्याबद्दल ओझर विद्यामंदिरचे मुख्याध्यापक डी. डी. जाधव यांनी उपक्रमात सहभागी झालेल्या विद्यार्थिनींचे आणि मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स