ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
नाभिक समाजाच्या उपक्रमांना पूर्ण पाठिंबा : माजी नगराध्यक्ष समिर नलावडे.

नाभिक समाजाच्या उपक्रमांना पूर्ण पाठिंबा : माजी नगराध्यक्ष समिर नलावडे.

प्रकाशन: 15 Aug 2023 09:39 PM
वाचन संख्या 115

संत शिरोमणी सेना महाराज यांच्या जीवन चरित्रावर आधारित ‘विठ्ठल भक्त सेना’ या दशावतारी नाट्य प्रयोगाचे उत्साहात उद्घाटन ; कणकवली नाभिक संघटनेचे आयोजन.

कणकवली | गणेश चव्हाण : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भालचंद्र महाराज संस्थान, कणकवली येथे आयोजित करण्यात आलेल्या संत शिरोमणी सेना महाराज यांच्या जीवन चरित्रावर आधारित ‘विठ्ठल भक्त सेना’ या दशावतारी नाट्य प्रयोगाच्या उद्घाटन प्रसंगी समिर नलावडे यांनी उपस्थित सर्वांना संबोधीत करताना, नाभिक समाजाला पूर्ण पाठिंबा असल्याचे सांगितले. नाभिक समाजाने जिल्ह्यात अनेक सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून, समाजामध्ये पारंपारीक लोककला रुजवण्या बरोबर कलाकारांना एक व्यासपीठ निर्माण करून दिलेले आहे. नाभिकाचा जन्म अर्थात विठ्ठल भक्त सेना या नाट्य प्रयोगाद्वारे समाज प्रभोधन करण्याचा हा उपक्रम खरोखरच कौतुकास्पद असल्याचे गौरोवोद्गार कणकवली माजी नगराध्यक्ष समिर नलावडे यांनी कणकवली येथे काल १४ ऑगस्टला काढले. यावेळी गोवाराज्याचे सचिव लाडु सुर्लकर, सौ. प्रतिभा चव्हाण व विजय चव्हाण यांनीही मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमासाठी, कणकवली नाभिक संघटनेने मेहनत घेतली. यावेळी कणकवली नाभिक संघटनेच्या वतीने कलाकारांना प्रशस्तीपत्रक,भेटवस्तू व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी नाभिक गोवा राज्य पोलिस निरिक्षक श्री तोरोसकर, सचिव लाडु सुर्लकर, महाराष्ट्र राज्य संघटक विजय चव्हाण, महिला जिल्हाध्यक्षा सौ. प्रतिभा चव्हाण, माजी जिल्हाध्यक्ष अनिल अणावकर, जिल्हा कार्याध्यक्ष शेखर चव्हाण, युवा जिल्हाध्यक्ष रुपेश पिंगुळकर, कणकवली तालुकाध्यक्ष रोषण चव्हाण, प्रविण कुबल, कणकवली महिला तालुकाध्यक्षा सौ. तेजस्विनी कुबल, कणकवली युवा तालुकाध्यक्ष रुपेश चव्हाण, सर्व पदाधिकारी व समाज बांधव भगिनी उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स