ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
चिंदर गावातील गुरे दगावलेल्या पशुपालकांना मिळणार आर्थिक मदत ; आमदार वैभव नाईक यांच्या जलद पाठवपुराव्याला यश.

चिंदर गावातील गुरे दगावलेल्या पशुपालकांना मिळणार आर्थिक मदत ; आमदार वैभव नाईक यांच्या जलद पाठवपुराव्याला यश.

प्रकाशन: 14 Aug 2023 11:39 PM
वाचन संख्या 154

आचरा विभागप्रमुख समीर लब्दे, अनिल गांवकर व पप्पू परुळेकर यांची माहिती.

आचरा | प्रसाद टोपले : आमदार वैभव नाईक यांच्या जलद पाठपुराव्यामुळे गेल्या महिन्यात अवघ्या सिंधुदुर्ग जिल्ह्याला हादरवून टाकलेल्या येथील मोठ्या प्रमाणात दगावलेल्या गुरांच्या पशुपालक धन्यांना आर्थिक दिलासा मिळणार आहे. लंपी आजारात पशु दगावलेल्या पशुपालकांना ज्याप्रमाणे शासनाने आर्थिक मदत केली त्याच धर्तीवर शासनाने मालवण तालुक्यातील गावात अज्ञात आजाराने गुरे दगावलेल्या पशुपालकांनाही नुकसान भरपाई द्यावी यासाठी कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी राज्याचे पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे – पाटील यांच्याकडे केलेल्या पाठपुराव्याला यश आले. गांवातील गुरे दगावलेल्या पशुपालकांना नुकसान भरपाई देण्याचे ना. राधाकृष्ण विखे-पाटील यांनी मान्य केले आहे. त्याबाबतची कार्यवाही सुरु करण्यात आली आहे अशी माहिती शिवसेना आचरा विभाग प्रमुख समीर लब्दे, उपविभाग प्रमुख अनिल गांवकर, ग्रा.प. सदस्य केदार (पप्पू) परुळेकर यांनी दिली आहे.

समीर लब्दे ( शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, आचरा विभाग प्रमुख )

मालवण तालुक्यातील गावात साथसदृष्य आराजाने जुलै महिन्यात अचानक ९७ गुरे बाधीत होऊन त्यापैकी ४६ गुरे दगावली. पशुधन अधिकारी यांनी तपासणी करुन बुरशीजन्य विषारी पदार्थ पोटात गेल्याने ही दुरे दगावल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला होता. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. याबाबत कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी विधानसभा अधिवेशनात प्रश्न उपस्थित केला होता. तसेच राज्याचे पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्याकडे १९ जुलै २०२३ रोजी पत्रव्यवहार करत
लंपी आजारात पशु दगावलेल्या पशुपालकांना ज्याप्रमाणे शासनाने आर्थिक मदत केली त्याच धर्तीवर शासनाने मालवण तालुक्यातील गावात अज्ञात आजाराने गुरे दगावलेल्या पशुपालकांनाही नुकसान भरपाई म्हणून आर्थिक मदत करावी अशी मागणी केली होती. या मागणीला ना. राधाकृष्ण विखे-पाटील यांनी सकारात्मक प्रतिसाद देत प्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

आमदार वैभव नाईक यांच्या संदर्भीय पत्र व मागणी नुसार महाराष्ट्र शासनाचे अवर सचिव डॉ. संजय डोईजोडे यांनी राज्याच्या पशुसंवर्धन आयुक्तांशी पत्रव्यवहार केला व गांवात गुरे दगावलेल्या पशुपालकांना नुकसान भरपाई म्हणून आर्थिक मदत देण्याबाबत अभिप्राय शासनास सादर करावेत अशा सूचना दिल्या आहेत. तर ना. राधाकृष्ण विखे-पाटील यांनी आमदार वैभव नाईक यांच्याशी चर्चा करताना येथील गुरे दगावलेल्या पशुपालकांना नुकसान भरपाई देण्याचे मान्य केले आहे. त्यामुळे आ.वैभव नाईक यांच्या प्रयत्नांना यश आले आहे माहिती शिवसेना आचरा विभाग प्रमुख समीर लब्दे, उपविभाग प्रमुख अनिल गांवकर, ग्रा.प. सदस्य केदार (पप्पू) परुळेकर यांनी देत शिवसेना पक्षाच्या माध्यमातूनही नुकसानग्रस्तांना आर्थिक मदत देण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स