ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
विद्यार्थ्यांना गुणवत्तापुर्ण शिक्षण देणेस शिशु विकास मंदिर कटीबध्द : महेश इंगळे

विद्यार्थ्यांना गुणवत्तापुर्ण शिक्षण देणेस शिशु विकास मंदिर कटीबध्द : महेश इंगळे

प्रकाशन: 15 Aug 2023 01:22 AM
वाचन संख्या 186

वटवृक्ष देवस्थानच्या शिशू विकास मंदिराचा विद्यार्थ्यांना गणवेश व शैक्षणिक साहित्याच्या वाटपाचा उपक्रम

मसुरे | प्रतिनिधी : श्री क्षेत्र अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे तत्कालीन माजी चेअरमन कै.कल्याणराव ( बाळासाहेब ) इंगळे यांनी २१ वर्षांपूर्वी अक्कलकोट शहरातील सर्वसामान्य पालकांची पाल्ये शिक्षणापासून वंचित राहू नये यानिमीत्ताने गोरगरीब घराण्यातील बालकांची शिक्षणाची गरज ओळखून देवस्थानच्या वतीने संस्थेच्या विठ्ठल मंदिर येथे श्री स्वामी समर्थ शिशु विकास मंदिर या नावे शिशु विकास मंदिराची स्थापना करून बालकांना मोफत शिक्षणाची सोय उपलब्ध करून दिली. आज या विद्या मंदिरात जवळपास २०० बालक मोफत शिक्षणाचा लाभ घेत आहेत. आधुनिक काळातील इंग्रजी शिक्षणाची गरज ओळखुन गेल्या १० वर्षांपासून इंग्रजी विषयही शिकविण्यात येत आहे. याकरिता आमच्या पाठीशी श्री स्वामी समर्थांचे आशीर्वाद व प्रेरणा आहेत. या प्रेरणेतून विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देणेस देवस्थानचे हे श्री स्वामी समर्थ शिशुविकास मंदिर कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन व नगरसेवक महेश इंगळे यांनी केले. देवस्थान संचलित श्री स्वामी समर्थ शिशु विकास मंदिर येथे ७६ व्या स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभुमीवर बालकांकरिता सालाबादाप्रमाणे यंदाही मोफत गणवेश व आवश्यक ते सर्व शैक्षणिक साहित्यांचे वाटप, शिक्षिकांना साड्यांचे वाटप देवस्थानचे चेअरमन महेश इंगळे व सचिव आत्माराम घाटगे यांचे हस्ते वाटप करण्यात आले त्या प्रसंगी महेश इंगळे बोलत होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते श्री स्वामी समर्थांच्या, विठ्ठलाच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मुख्याध्यापिका स्वाती गाडे जाधव यांनी केले, तर आभार सचिव आत्माराम घाटगे यांनी मानले.

याप्रसंगी देवस्थानचे विश्वस्त महेश गोगी, संपतराव शिंदे, शिवशरण अचलेर, श्रीशैल गवंडी, मुख्याध्यापिका स्वाती गाडे, शिक्षिका शशिकला मडीखांबे, वंदना शिर्के, जयश्री माने, गिरीश पवार, संजय पवार, सागर गोंडाळ, व विद्यार्थ्याचे पालक आदी उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच...

13 Sep 2026 22
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 329

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स