वायरीत कीर्तन महोत्सवाचे आयोजन ; हनुमान जन्मोत्सव मंडळाचे आयोजन.
मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण शहरातल्या वायरी येथे कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. १६ ऑगस्टला हा महोत्सव सुरु होत असून त्यादिवशी तारकर्ली येथील श्री दाजी मालवणकर यांचे कीर्तन सादर होणार आहे. २३ तारखेला वायरीचे श्री विनोद सातार्डेकर, २ सप्टेंबरला धामापूरचे श्री. महेश धामापूरकर व ९ सप्टेंबरला वायरीचे श्री. प्रभूदास आजगांवकर यांचे कीर्तन सादर होणार आहे.
या महोत्सवात रोज संध्याकाळी ७ वाजता कीर्तनाचा आरंभ होईल. या अध्यात्मिक आनंदाचा जास्तीत जास्त लोकांनी लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)