समिता मोंडकर यांचे निधन.
शिरगांव | संतोष साळसकर : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील
देवगड तालुक्यातल्या शिरगांव, आंबेखोल येथील समिता संतोष मोंडकर (वय ५१) यांचे आजाराने ८ ऑगस्ट रोजी उपचारादरम्यान निधन झाले. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच सायंकाळी शिरगांव बाजारपेठ बंद ठेवून श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यांच्या पश्चात पती, मुलगी, दोन मुलगे असा परिवार आहे.
शिरगांव बाजारपेठेतील किराणा व्यावसायिक संतोष मोंडकर यांच्या त्या पत्नी होत.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)