ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
रामगड येथे टेंपोला अपघात ; क्लीनर जागीच ठार.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

रामगड येथे टेंपोला अपघात ; क्लीनर जागीच ठार.

प्रकाशन: 08 Aug 2023 07:36 PM
वाचन संख्या 1878

कणकवली | गणेश चव्हाण : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली – आचरा मार्गावर आचरा येथुन कणकवली कडे बिस्कीटे, कुरकुरे घेऊन जाणारा टेम्पो रामगड – सडेवहाळ येथे जागेवरच पलटी होऊन नाटळ बौद्धवाडी येथील रविंद्र कदम हे इसम ( क्लीनर) जागीच मृत झाले. हा अपघात आज ( ८ ऑगस्ट) संध्याकाळी ५ वाजताच्या सुमाराला झाला.

कणकवली येथील एजन्सी चा टेंपो क्र. एम एच ०७ ए. जे. २६६१ हा छोटा टेंपो आचरा येथुन दुकानदारांना बिस्किट, कुरकुरे देत कणकवलीच्या दिशेने जात होता. टेंपोत ड्रायव्हर हर्षल पाताडे व मयत क्लिनर रविंद्र कदम असे दोघेच होते. रामगड सडेवाडी येथे गाडी आल्यावर अचानक गाडीचे स्टिअरींग लाॅक झाल्याने हा अपघात झाला. समोर कोणतेच वाहन, माणसे किंवा जनावरे नसल्याने आणखीन कोणतीही हानी नाही. ड्रायव्हर पाताडे रा. कणकवली यांना दुखापत झाली नाही. गाडीचे मात्र मोठे नुकसान झाले. हा अपघात रामगड येथे सडेवहाळ पुलावर झाला. आचर्‍या हून कणकवलीच्या दिशेने जात असताना डाव्या साईडची गाडी उजव्या बाजूला पलटी झाल्याने, पुलाचे संरक्षण गार्ड सुद्धा तुटले गेले. अशा अवस्थेत ड्रायव्हर काहीच करू शकले नाहीत. परंतु दुर्दैवाने क्लीनरचा जागीच मृत्यू झाला. येथे पूर्णपणे वळण असल्यामुळे समोरच्या गाड्या दिसत नाही. या ठिकाणी या पूर्वीही अनेक अपघात झालेले आहेत.

या अपघाताचे माहिती मिळतात बेळणे पोलीस स्टेशनचे पोलीस हेडकॉन्स्टेबल सहदेव कांबळे व सहकारी सागर कांजर घटनास्थळी लगेच उपस्थित राहून, पंचनामा केला व मयताला कणकवली उपजिल्हारुग्णालयात पाठवले.

मयत रविंद्र कदम टेंपोखाली चिरडल्याने, याच मार्गावरुन जाणार्‍या डंपरच्या सहाय्याने मयत त्यांना बाहेर काढले.

वाहतुक पोलिस हवालदार विकास रा. जाधव व पोलिस काॅन्स्टेबल एम. के. शिरडे यांनी तत्काळ येऊन वाहतुक व्यवस्था सुरळीत केली. यावेळी अपघाताची बातमी समजताच रामगड ग्रामस्थांनी मदतीसाठी सहकार्य केले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स