ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
श्रावणात आज संध्याकाळी ७ वाजता दिसला गवारेड्यांचा कळप ; शेतकरी व कष्टकरी वर्गात दहशत..!
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

श्रावणात आज संध्याकाळी ७ वाजता दिसला गवारेड्यांचा कळप ; शेतकरी व कष्टकरी वर्गात दहशत..!

प्रकाशन: 08 Aug 2023 08:59 PM
वाचन संख्या 453

कणकवली | गणेश चव्हाण : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या श्रावण येथे आज संध्याकाळी ७ वाजता, आठ ते दहा रानटी गवारेड्यांचा कळप वावरताना दिसला. या रानटी गवारेड्यांच्या भीतीपोटी शेतकरी, मोलमजुरी करणारे मजूर यांच्या जीवाला धोका आहे. त्याची दखल वन अधिकाऱ्यांनी वेळेत घेऊन लोकांचे जीवाचं संरक्षण करावे अशी जनतेची मागणी आहे.

श्रावण व गवळीवाडी स्टॉप यांच्यामध्ये असलेल्या इडीच्या ओढ्यावरून हा कळप गवळीवाडीच्या दिशेने मार्गस्थ झाला अशी माहिती बेळणे पोस्ट चेकला असलेल्या होमगार्ड कर्मचाऱ्यांनी आचर्‍याच्या दिशेने घरी जाताना पाहिले. हे रानटी गवारेडे सिंधुदुर्गात जवळपास प्रत्येक गावागावात पोहोचल्याने येथील जनजीवन भयभीत होत आहे. महाराष्ट्र शासनाने या रानटी जनावरांचा वेळीच बंदोबस्त करावा अन्यथा यां प्राण्यांपासून सर्वसामान्यांचेही जीवाला मोठा धोका निर्माण झाला आहे. शेतकरी वर्गांना जीवन जगणे असह्य झाले आहे अशीही प्रतिक्रिया काही ठिकाणाहून येत आहे.

फोटो | संग्रहीत

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

लोकप्रिय टॅग्स