ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
भाजपचे आमदार नितेश राणेंची पावसाळी अधिवेशनात तांडावस्ती सुधार योजनेतून लोकसंख्येचा निकष काढून टाकण्याची मागणी.

भाजपचे आमदार नितेश राणेंची पावसाळी अधिवेशनात तांडावस्ती सुधार योजनेतून लोकसंख्येचा निकष काढून टाकण्याची मागणी.

प्रकाशन: 26 Jul 2023 10:07 AM
वाचन संख्या 162

सिंधुदुर्ग व कोकणातील धनगर वस्त्या विकासाच्या प्रवाहात आणण्याचा मानस.

नवलराज काळे | सहसंपादक : तांडा वस्ती सुधार योजनेच्या निधीसाठी लोकसंख्येचा निकष आहे. कोकणातील धनगर समाज दऱ्याखोऱ्यात राहतो एका एका वाडी वरती पुरेशी लोकसंख्या नसल्यामुळे तांडा वस्ती निकषांमध्ये काही धनगर वस्त्या बसत नाहीत. त्यामुळे धनगर वस्तीचा विकास होत नाही आहे ज्या उद्देशाने तांडा वस्ती सुधार योजना लागू केली आहे तो उद्देश साध्य होत नाही. त्यामुळेच तांडा वस्ती सुधार योजनेतून लोकसंख्येचा निकष काढून टाकावा व थेट धनगर वाडीवस्तीना तांडा वस्ती सुधार योजनेतून निधी उपलब्ध व्हावा अशी मागणी भाजप नेते आमदार नितेश राणे यांनी पावसाळी अधिवेशनात केली.

या मागणीवर मंत्रिमहोदय यांनी संबंधित विषयासंदर्भात बैठक लावून सकारात्मक निर्णय घेऊ असे सांगितले. आमदार नितेश राणे यांच्या मागणी नुसार हा निकष हटवला गेल्यास अनेक कोकणातील धनगर वस्त्या विकासाच्या प्रवाहात येतील त्यामुळे मंत्री महोदयांच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

लोकप्रिय टॅग्स