शिरगांवच्या सुप्रसिद्ध 'साटम मेडिकल व जनरल स्टोअर्स' यांचे १ ऑगस्ट पासून नवीन जागेत स्थलांतर ; वास्तुच्या उद्घाटन सोहळ्याचे आयोजन.
मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातल्या शिरगांव येथील सुप्रसिद्ध ‘साटम मेडिकल व जनरल स्टोअर्स’ यांचे नवीन जागेत स्थलांतर होत आहे. देवगड तालुका व शिरगांव तसेच आसपासच्या इतर गांवांसाठी अविरतपणे गेली २३ वर्षे साटम मेडिकल व जनरल स्टोअर्स सेवा बजावत आहे. १ ऑगस्टला सकाळी १० वाजता , शिरगांव एस.टी.स्टॅन्ड समोरील त्यांच्या नूतन वास्तुच्या उद्गाटनाचा सोहळा आयोजीत करण्यात आला आहे.
साटम मेडिकल व जनरल स्टोअर्सचे सुधीर साटम यांनी या नूतन वास्तू सोहळ्याला सर्वांना निमंत्रीत केले आहे. आपल्या सर्व ग्राहकांसाठी आणखी नियोजनबद्ध पद्धतीने विनम्र सेवा देण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)