मालवण-कसाल मार्गावर खोदलेल्या चरांमुळे मुख्य रस्त्याला धोका..!
मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या मालवण-कसाल या प्रमुख दळणवळणाच्या मार्गावर वराड-सावरवाड तिठा येथे रस्ता खचायचा धोका उत्पन्न होत आहे.
या मार्गावर खोदलेल्या चरांमधून यंदाच्या जोरदार पावसाचे पाणी वाहून ते चर अधिक रुंद झाले आहेत. आता चर व मुख्य डांबरी रस्ता यांमध्ये केवळ ३ फुटांचाच व तोही भुसभूशीत जमिनीचा भाग उरलेला आहे. पुढे मोठा अनर्थ घडण्यापूर्वीच संबंधीत विभाग तथा यंत्रणेने यांकडे गांभीर्याने पहाणी करुन तत्काळ उपाययोजना करावी असे आवाहन या मार्गावरील प्रवासी वर्ग व स्थानिक समाज सेवी व्यक्तींनी केले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)