ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
आ. नितेश राणे यांच्या पहाणी नंतर गगनबावडा-तरेळे मार्गावर पावसाळी डांबराने खड्डे भरायचे काम तत्काळ सुरु.

आ. नितेश राणे यांच्या पहाणी नंतर गगनबावडा-तरेळे मार्गावर पावसाळी डांबराने खड्डे भरायचे काम तत्काळ सुरु.

प्रकाशन: 25 Jul 2023 07:44 PM
वाचन संख्या 213

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकार्यांची त्वरीत काम पूर्ण करायची कबुली.

नवलराज काळे | सहसंपादक : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी- देवगड- कणकवलीचे आमदार नितेश राणे यांच्या पहाणीनंतर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाने तरळे – गगनबावडा मार्गावर खड्डे भरण्याचे काम सुरू केले आहे. पावसाळी डांबरानेच खड्डे भरण्याचे काम पूर्ण केले जाईल असे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. हे काम सुरू झाल्याने प्रवासी व वाहन चालकांत समाधान व्यक्त होत आहे.

तरेळे – गगनबावडा या राष्ट्रीय महामार्गाची अक्षरशः चाळण झाली होती. नाधवडे, कोकिसरे करूळ गावानजीक मार्गावरुन चालणे ही अवघड झाले होते. तर करूळ घाट अक्षरशः खड्ड्यात गेला होता अशा पार्श्वभूमीवर शनिवारी आमदार नितेश राणे यांनी या रस्त्याची व घाटाची पाहणी केली. महामार्गाचे अधिकारी अतुल शिवनिवार यांना त्यांनी धारेवर धरत खडे बोल सुनावले होते. आमदार नितेश राणे यांच्या आक्रमक पवित्र्यानंतर अधिकाऱ्यांनी मार्गावरील खड्डे पावसाळी डांबराने त्वरीत भरले जातील व गटार सफाईची कामे केली जातील असे कबूल केले होते.

सोमवार पासून नाधवडे येथील खड्डे भरण्याचे काम सुरू झाले आहे. तर कोकिसरे, करुळ व करूळ घाटातील ही खड्डे भरण्यात येणार आहेत.केंद्रीय मंत्री नारायण राणे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या प्रयत्नाने या महामार्गासाठी जवळपास २५० कोटी मंजूर झाले आहेत. हे काम देखील काही महिन्यात सुरु होणार आहे. मात्र त्यापूर्वी खड्डे भरण्यात येत असल्याने गावातील ग्रामस्थ, वाहन चालक व प्रवाशांनी समाधान व्यक्त केले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स