ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
लेखन व पत्रकारितेची 'शिरीष कणेकरी तोफ' झाली शांत..!

लेखन व पत्रकारितेची 'शिरीष कणेकरी तोफ' झाली शांत..!

प्रकाशन: 25 Jul 2023 02:50 PM
वाचन संख्या 187

एका अष्टपैलू लेखकाच्या पूर्णविरामाने लेखन विश्वात मोठी पोकळी.

सुयोग पंडित | मुख्य संपादक : सहज लेखनाची ‘कणेकरी तोफ’ आणि ज्येष्ठ पत्रकार, लेखक शिरीष कणेकर यांचे आज सकाळी निधन झाले. ते ८० वर्षांचे होते. आज सकाळी प्रकृती खालावल्यामुळे शिरीष कणेकर यांना हिंदुजा रुग्णालयात दाखल केले होते. याच दरम्यान हृदयविकाराच्या धक्क्याने त्यांचे निधन झाले. शैलीदार बेधडक लेखक आणि फिल्मी गप्पांची मैफल रंगविणारे बहारदार वक्ते अशी शिरीष कणेकर ख्याती असलेल्या कणेकरांनी सिनेमा, क्रिकेट आणि राजकारणावर त्यांनी अत्यंत निर्भीड मार्मिमकतेने लेखन केले होता. ‘कणेकरी’, ‘फिल्लमबाजी’, ‘शिरीषासन’ हे त्यांचे विनोदी लेख महाराष्ट्र राज्याला अखंड स्मरणात आहेत. शिरीष कणेकर यांच्या निधनानंतर पत्रकारिता आणि लेखन क्षेत्रात पोकळी निर्माण झाली असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

शिरीष कणेकर यांनी मुंबई विद्यापीठातून एलएलबी केलं. पत्रकार म्हणून त्यांनी इंडियन एक्स्प्रेस, फ्री प्रेस जर्नल या प्रसिद्ध इंग्रजी वृत्तपत्रांतून काम केलं आहे. याशिवाय लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स, सामना आणि जवळपास सगळ्याच मराठी वृत्तपत्रांतील त्यांचे स्तंभलेखन प्रसिद्ध होते. त्याचप्रमाणे साप्ताहिक मनोहर, लोकप्रभा, चित्रलेखामधील त्यांचे लेख प्रसिद्ध आहेत. ‘लगाव बत्ती’ या त्यांच्या कथासंग्रहास महाराष्ट्र साहित्य परिषदेचा उत्कृष्ट विनोदी वाङ्‌मयाचा चिं.वि. जोशी पुरस्कार मिळाला होता.

रायगड जिल्ह्यातील पेण हे शिरीष कणेकर यांचं मूळ गाव. त्यांचे वडील रेल्वेमध्ये डॉक्टर होते. त्यामुळे भायखळ्याच्या रेल्वे रुग्णालयाच्या सरकारी निवासस्थानात त्यांचे लहानपण गेले. शिरीष कणेकर हे मराठीतील ज्येष्ठ लेखक, पत्रकार आणि कथाकथनकार होते. क्रीडा आणि सिने-पत्रकारितेवर त्यांनी विपुल लेखन केलेले आहे. आधुनीक ललित साहित्यातील असंख्य वाचक व लेखकांचा दीपगृह अशी ओळख असलेल्या शिरीष कणेकरांना भावपूर्ण श्रद्धांजली.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स