मनसे जिल्हाध्यक्ष श्री.राजन दाभोळकर यांचे दुःखद निधन….!
संघटनात्मक कार्याचा आग्रही नेता गमावल्याची माजी आम. परशुराम उपरकर यांची प्रतिक्रिया….
कणकवली | प्रतिनिधी : मनसेचे विद्यमान जिल्हाध्यक्ष श्री.राजन दाभोलकर यांचे आज सकाळी दीर्घ आजाराने निधन झाले.
आज दुपारी बारा वाजता त्यांच्या मूळ गावी दाभोळ येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत असल्याची माहिती मनसेचे माजी आमदार श्री परशुराम उपरकर यांनी दिली.
श्री उपरकर यांनी संपूर्ण मनसे पक्षातर्फे आणि व्यक्तिशः श्री.राजन दाभोळकर यांना श्रद्धांजली वाहिली.
पक्षाच्या स्थापनेपासून श्री दाभोळकर हे पक्षाच्या बांधणीसाठी आणि सक्षमीकरणासाठी कार्यरत होते आणि जनहीतांच्या अनेक आंदोलनामध्ये त्यांनी प्रभावीपणे उपोषणेही केली होती म्हणून पक्ष एका सच्च्या कार्यकर्त्या नेत्याला मुकला असल्याचेही श्री उपरकर यांनी श्रद्धांजलीद्वारा सांगितले.
राजन दाभोळकर यांच्या निधनाने सिंधुदुर्ग जिल्हातील राजकीय क्षेत्रातून शोक व्यक्त होत आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)