हडी ज्येष्ठ नागरीक संघ करणार विविध गुणवंतांचा गौरव ; इच्छुकांनी ३ ऑगस्टपूर्वी गुणपत्रिकेची झेराॅक्स सादर करायचे आवाहन.
मसुरे | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील हडी येथील फेस्कॉम संलग्न जेष्ठ नागरिक संघाच्या वतीने हडी गावातील गुणवंत विध्यार्थ्यांचा सत्कार १५ ऑगस्टला करण्यात येणार आहे.
गांवातील दहावी, बारावी, पदवी परीक्षा, स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी आपल्या गुणपत्रिकेची झेरॉक्स प्रत संघाच्या अध्यक्ष चंद्रकला कावले, सचिव सुभाष वेंगुर्लेकर, माजी सचिव चंद्रकांत पाटकर यांच्याकडे ३ ऑगस्ट २०२३ पूर्वी देणे आवश्यक आहे. संबंधित इच्छुक विद्यार्थ्यांनी त्वरित संपर्क साधण्याचे आवाहन संघाच्या अध्यक्ष श्रीमती चंद्रकला कावले, माजी सचिव चंद्रकांत पाटकर यांनी केले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)