ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
अधिक मासानिमीत्त श्री क्षेत्र अक्कलकोट येथील वटवृक्ष मंदिरात ३ दिवसांच्या  दत्तयागचे आयोजन.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

अधिक मासानिमीत्त श्री क्षेत्र अक्कलकोट येथील वटवृक्ष मंदिरात ३ दिवसांच्या दत्तयागचे आयोजन.

प्रकाशन: 24 Jul 2023 06:42 PM
वाचन संख्या 148

मसुरे | प्रतिनिधी : यंदाचा अधिक मास तसेच समाधानकारक पाऊस होण्याकरीता येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात ३ दिवसीय दत्त यागाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती मंदीर समितीचे चेअरमन व नगरसेवक महेश इंगळे यांनी दिली.
दिनांक २५ जुलै ते दिनांक २७ जुलै २०२३ अखेर इंगळे कुटुंबीयांच्या तिसऱ्या पिढीचे मानकरी स्वामी सेवक व मंदिर समितीचे अध्यक्ष महेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली व चोळप्पा महाराजांचे वंशज प.पू.मोहनराव महाराज पुजारी, प.पू.मंदार महाराज पुजारी यांच्या अत्तधिपत्याखाली बदलापूरचे प्रसाद गुरुजी व ब्रह्मरुंदाच्या वतीने हे दत्तयाग संपन्न होईल. या दत्तयाग सेवेत दिनांक २५ जुलै रोजी सकाळी ७ : ३० ते ८ : ३० या वेळेत गणपती कुलेष्ट देवता, वास्तू देवता, ग्रामदेवता आवाहन, सकाळी ८ : ३० ते ९ : ३० या वेळेत आचमन, प्राणायाम, मंगलाचरण, देवता गुरुवंदन शांतीपाठ, प्रायश्चित संकल्प, गोमाता पूजन, विष्णुपूजन, पंचगव्य प्राशन, यज्ञोपवित धारण, यथाशक्ती गोदान संकल्प, याग संकल्प, सकाळी ९ : ३० ते ११ या वेळेत गणपती पूजन, पुण्याहवाचन, मातृका पूजन, वसोर्धरा पूजन, नांदीश्राद्ध, सकाळी ११ ते ११ : ३० या वेळेत आचार्यादी, ऋत्वीज्वरण, ब्राह्मण पूजन, दिग्रक्षण, मंडप शुद्धी, कुंड पूजन, सकाळी ११ : ३० ते २ : ३० या वेळेत अग्निमंथन, अग्नी स्थापना, वास्तू योगिनी, क्षेत्रपाल, दत्तभद्र, मंडल देवता स्थापन, देवता अभिषेक पूजन, दुपारी ४ ते ६ : ३० या वेळेत नवग्रहमंडल स्थापन, रुद्रकलश स्थापन, नवग्रह होम, सायंपूजन आरती इत्यादी विधी संपन्न होतील. दिनांक दि.२६ जुलै रोजी सकाळी ८ ते ११ : ३० या वेळेत मंगलाचरण, शांतीपाठ, पीठमंडल, देवता प्रात पूजन, दत्तात्रेय स्वामी आवाहित देवता अभिषेक पूजन, पूजन अर्चन, ब्राम्हण पुजन, दुपारी ३ : ३० ते ६ : ३० या वेळेत नवग्रह हवन, प्रदान दत्तमाला मंत्र हवन, सायं पूजन, आरती इत्यादी विधी संपन्न होतील.

दिनांक २७ जुलै रोजी सकाळी ७ : ३० ते दुपारी १ : ३० या वेळेत मंगलाचरण, शांतीपाठ, पीठमंडल, देवता प्रातः पूजन, दत्तात्रय स्वामी आवाहित देवता अभिषेक पूजन अर्चन, स्थापित देवता होम, उत्तरांग पूजन, दुपारी १२ : ३२ ते १२ : ५७ या वेळेत अभिजीत मुहूर्त, लाभ योग, आरती आशीर्वाद, ब्राह्मण पूजन, कर्म समापन, पूर्णाहुती इत्यादी विधी संपन्न होऊन हा दत्त याग सोहळा पूर्णत्वास जाईल. राज्यात व आपल्या जिल्ह्यात समाधानकारक पाऊस व्हावे याकरिता स्वामी चरणी या दत्त आयोगाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती मंदिर समितीचे चेअरमन महेश इंगळे यांनी दिली.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच...

13 Sep 2026 89
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 453

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स