ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
आ. नितेश राणे हे 'श्री सद्गुरु आप्पास्वारी तथा आप्पा साहेब धर्माधिकारी' यांच्या मूळ आदेशाचे उल्लंघन करतायत : आमदार वैभव नाईक
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

आ. नितेश राणे हे 'श्री सद्गुरु आप्पास्वारी तथा आप्पा साहेब धर्माधिकारी' यांच्या मूळ आदेशाचे उल्लंघन करतायत : आमदार वैभव नाईक

प्रकाशन: 24 Jul 2023 02:52 PM
वाचन संख्या 277

आ. नितेश राणे हे चुकिची माहिती पसरवत असल्याचे आ. वैभव नाईक यांचे प्रतिपादन.

मालवण | सुयोग पंडित : केवळ मतांसाठी राजकारण करण्याकरिता, आमदार नितेश राणे हे सद्गुरु आप्पा साहेब धर्माधिकारी (स्वारी) यांच्या विषयी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाबद्दल व आमदार वैभव नाईक यांच्याबद्दल चुकिची माहिती पसरवत असल्याचे प्रतिपादन आमदार वैभव नाईक यांनी केले आहे.

महाराष्ट्र भूषण, पद्मविभूषण . सद्गुरु आप्पा साहेब धर्माधिकारी यांच्या बद्दल आणि सर्व सदस्यांबद्दल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे व पक्षातील सर्वच आमदार यांच्या मनात नेहमीच आदराची भावना राहिली आहे. विधानसभेमध्ये महाराष्ट्र भूषण पुरस्कार वितरण कार्यक्रमाबाबत उपस्थित प्रश्नावर शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या कोणत्याच आमदारांनी सहभाग घेतला नाही. सदर चर्चेमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या कोणत्याही आमदारांनी सहभाग घेतला नव्हता आणि याचे रेकॉर्ड देखील विधानसभेत उपलब्ध आहे असे आमदार वैभव नाईक यांनी स्पष्ट केले आहे.

राजकारण व समाजातील इतर बाह्य वादविवादात सद्गुरु बैठक, सदस्य तसेच सेवेबद्दल कधीच भाष्य करु नये व कोणाचेही नांव घेऊ नये ही सद्गुरु आप्पा साहेब धर्माधिकारी यांची आदेशाची शिकवण आहे आणि महाराष्ट्र भूषण निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या याच ‘मूळ आदेशाचे’ उल्लंघन आमदार नितेश राणे करीत आहेत. महाराष्ट्र भूषण निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी व सदस्य आणि राजकारण या वेगवेगळ्या गोष्टी असून आमदार नितेश राणे हे नेहमीच मतांच्या राजकारणासाठी अशा प्रकारची वक्तव्य करत असतात. निश्चितच विधानसभेमधील कामकाजाबाबत आमदार नितेश राणे चुकीची माहिती प्रसिद्ध करीत असल्याबाबत विधानसभा अध्यक्षांच्या निदर्शनास आणून देणार असल्याचे आमदार वैभव नाईक यांनी स्पष्ट केले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच...

13 Sep 2026 89
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 455

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स