कळसुली तंटामुक्ती अध्यक्षपदी श्री. चंदू परब..!
भरघोस मतांनी मिळविला विजय…!
कणकवली | उमेश परब : आज कळसुली गावची ग्रामसभा प्राथमिक आरोग्य केंद्र कळसुलीच्या सभागृहात सरपंच, ग्रामपंचायत सदस्य तसेच गावातील ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत पार पडली. तंटामुक्त समिती अध्यक्ष व सभासद निवड हा प्रमुख विषय होता.
अध्यक्ष पदासाठी श्री. चंदू परब भोगणाथवाडी आणि रामचंद्र अर्जुन सावंत भोगणाथवाडी हे दोन उमेदवार निवडणूक रिंगणात होते. मतदारांनी श्री. चंदू परब यांना पसंती दाखवून त्यांना भरघोस मतांनी विजयी केले. विजयानंतर बोलताना श्री. चंदू परब यांनी सर्व मतदारांचे आभार व्यक्त करुन दिलेली जबाबदारी अतिशय प्रामाणिकपणे पार पाडली जाईल असे आश्वासन गावकऱ्यांना दिले.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)