अतिवृष्टीमुळे उद्या जिल्ह्यातील शाळा रहातील बंद ; प्रादेशिक हवामान खात्याने जिल्ह्यात यल्लो ॲलर्ट जाहीर केल्याने जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांचे आदेश.
ब्युरो न्यूज | सिंधुनगरी (ओरोस) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व शाळा तसेच अंगणवाडी यांना उद्या २० जुलैला सद्य स्थितीतिल अतिवृष्टी व आगामी काही तासांतला पावसाचा यल्लो ॲलर्ट या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी यांनी सुटी जाहीर केली आहे.
प्रादेशिक हवामान खात्याच्या पूर्वसूचनेनुसार जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी यांनी आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या अध्यक्ष या जबाबदारीने खबरदारी म्हणून हा निर्णय जाहीर केला आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)