ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
वैभववाडीत लवकरच बेकायदेशीर स्टॉल, खोके हटाव मोहीम : तहसीलदार दिप्ती देसाई.

वैभववाडीत लवकरच बेकायदेशीर स्टॉल, खोके हटाव मोहीम : तहसीलदार दिप्ती देसाई.

प्रकाशन: 13 Jul 2023 08:07 AM
वाचन संख्या 298

वाभवे-वैभववाडी नगराध्यक्षा नेहा माईणकर व सहकार्यांनी बेकायदेशीर अतिक्रमण संदर्भात दिले लेखी निवेदन.

नवलराज काळे | सहसंपादक : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील
वैभववाडी शहरात स्टाॅल अतिक्रमण संदर्भात नगरपंचायत मार्फत बेकायदेशीर तथा विना परवानगी अतिक्रमणधारकांना आता चाप बसायची शक्यता आहे. वाभवे – वैभववाडी नगराध्यक्षा नेहा माईणकर यांनी गाळे, खोके व हातगाडी लावण्यास परवानगी दिली आहे का व परवानगी दिली नसल्यास तत्काळ अतिक्रमण हटवा अशा मागणीचे लेखी निवेदन वैभववाडी तहसीलदार दिप्ती देसाई यांना दिले आहे.

अतिक्रमण करणाऱ्या स्टॉल धारकांना अतिक्रमण हटविण्यासंदर्भात रीतसर नोटीस दिली जाईल. त्यांनी अतिक्रमण न हटविल्यास स्टॉल हटाव मोहीम हाती घेतली जाईल असे तहसीलदार देसाई यांनी या निवेदना बद्दल प्रतिक्रिया देताना सांगितले. वाभवे – वैभववाडी नगरपंचायत हद्दीतील शासकीय जागेत सद्यस्थितीत विनापरवाना गाळे, खोके व हातगाड्या दिसून येत आहेत. नगरपंचायतने सर्वसाधारण सभेत अतिक्रमण हटाव बाबत ठराव संमत केला आहे. त्यानुसार नगरपंचायतने अतिक्रमण हटविले होते. मात्र पुन्हा एकदा नगरपंचायत हद्दीत राज्यमार्गाच्यालगत मोठ्या प्रमाणात गाले, हातगाड्या व खोके परवानगी शिवाय दिसून येत आहेत. नगरपंचायत मार्फत शहरात विविध विकास कामे प्रस्तावित आहेत. ती कामे करताना हे सध्या असलेले बेकायदा अतिक्रमण हे अडथळा ठरणार आहे. अतिक्रमण आपल्या विभागाच्या अखत्यारीमधील जमिनीत होत आहे. या अतिक्रमणधारकांना स्टॉल, गाले व हातगाड्या लावण्यास आपणाकडून परवानगी देण्यात आली आहे का व देण्यात आली असली तर परवानगीची प्रत नगरपंचायतीला उपलब्ध करून देण्यात यावी आणि परवानगी दिली नसल्यास आपल्या स्तरावर सदर अतिक्रमणावर तात्काळ कारवाई करावी असेही निवेदनात नमूद आहे.

निवेदन देताना नगराध्यक्षा नेहा माईणकर, उपनगराध्यक्ष संजय सावंत, बांधकाम सभापती विवेक रावराणे, नगरसेवक डॉ. राजेंद्र पाताडे, माजी जि. प. सदस्य सुधीर नकाशे, नगरसेवक सुभाष रावराणे, नगरसेविका यामिनी वळवी, सुंदरा निकम, रेवा बावदाने व राजन तांबे आदी उपस्थित होते.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

लोकप्रिय टॅग्स