ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
मुणगे येथे यशस्विनी प्रतिष्ठान आणि संघर्ष मित्र मंडळाचे शैक्षणिक दातृत्व.

मुणगे येथे यशस्विनी प्रतिष्ठान आणि संघर्ष मित्र मंडळाचे शैक्षणिक दातृत्व.

प्रकाशन: 10 Jul 2023 06:38 AM
वाचन संख्या 186

मसुरे | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातल्या मुणगे येथे यशस्विनी प्रतिष्ठान आणि संघर्ष मित्र मंडळ आडबंदर, मुंबई यांच्या सौजन्याने श्री भगवती हायस्कूल आणि कै. वीणा सुरेश बांदेकर ज्युनिअर कॉलेज मधील दहावी आणि बारावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या प्रथम ३ क्रमांकाच्या विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह आणि रोख रक्कम देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आले.

याप्रसंगी यशस्विनी प्रतिष्ठानच्या सल्लागार सौ. रवीना मालाडकर, सौ.अंजली सावंत, सौ.देवयानी राणे, श्री.तुषार आडकर, श्री.योगेश लब्दे, श्री.शिवदास रासम, श्री.अशोक सावंत आणि पालक समिती यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले. पुढील शैक्षणिक वर्षासाठी खूप शिका मोठे व्हा आपल्या आईवडिलांचे, शिक्षकांचे नाव मोठे करा आणि ज्या शाळेमध्ये शिकलात त्या शाळेची आठवण, आपुलकी, अभिमान नेहमी तुमच्या हृदयात जपून ठेवा अशा शुभेच्छा देण्यात आल्या.

शाळेचा मुख्याध्यापिका श्रीमती. एम. बी. कुंज, सौ. गौरी तवटे , श्री. प्रसाद बागवे, श्री. एन जी विरकर, हरीश महाले, सौ कुमठेकर उपस्थित होते. यावेळी यशस्विनी प्रतिष्ठान आणि संघर्ष मित्र मंडळ यांचे आभार मानण्यात आले व यशस्विनी प्रतिष्ठान आणि संघर्ष मित्र मंडळ यांच्या वतीने देखील उपस्थित सर्वांचे आभार मानण्यात आले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स