राज्यस्तरीय स्वच्छता सर्वेक्षण समितीने केले ग्रामपंचायत सडुरे शिराळेचे परीक्षण ; स्वागत कार्यक्रमात ग्रा. पं. सदस्य नवलराज काळे यांच्या एकपात्री प्रहसनातून सामाजिक संदेश .
वैभववाडी | प्रतिनिधी : स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण मधून राज्यस्तरीय स्पर्धेत जिल्ह्यातील १५ ग्रामपंचायतींची निवड केली. त्या मध्ये वैभववाडी तालुक्यातून एकमेव सडूरे शिराळे ग्रामपंचायत ची निवड झाली होती. या पार्श्वभूमीवर ८ जुलैला राज्यस्तरीय स्वच्छता सर्वेक्षण समितीने केले. ग्रामपंचायत सडुरे शिराळेचेही परीक्षण करण्यात आले. गांवात ठिकठिकाणी समितीच्या पदाधिकाऱ्यांनी पाहणी केल्यावर ग्रामपंचायत कार्यालयात या समितीची आढावा बैठक संपन्न झाली. या आढावा बैठकीत संत गाडगे महाराज यांच्या प्रतिमेला हार घालून व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची उद्घाटन झाले. उपस्थित मान्यवरांना सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य यांच्या शुभहस्ते सोनचाफा आणि काजूचे झाडे भेट स्वरूपी देऊन स्वागत केले.
या स्वागत समारंभाच्या कार्यक्रमाचे आकर्षण ठरले ते ग्रामपंचायत सदस्य नवलराज विजयसिंह काळे यांनी केलेल्या एकपात्री नाटक…! सरपंच व कार्यकारणीच्या मान्यतेने करण्यात आलेले हे एक पात्री नाटकाचे नवलराज काळे यांनीच लेखन व दिग्दर्शन केले व संपूर्ण एकपात्री नाटकाचे कलाकार म्हणून नवलराज काळे यांनी काम पाहिले. जनतेला आपले गांव सोडून न जाण्याचा संदेश दिला शहराकडे न जाता गावातच राहून आपला सर्वांगीण विकास होऊ शकतो या ठिकाणी राबवत असलेल्या स्वच्छता अभियानात आपण सर्वांनी भाग घेऊन आपला आरोग्य आपला परिसर स्वच्छ ठेवण्याकरिता एक पाऊल पुढे यावं असा आवाहन या कार्यक्रमाच्या माध्यमातून असंख्य पात्रांच्या भूमिकेत जाऊन शेवटी एका शेतकऱ्याच्या रूपाने ग्रामपंचायत सदस्य नवलराज काळे यांनी गावातील जनतेला स्वच्छतेचा आणि गावात राहण्याचा संदेश दिला. तसेच ग्रामपंचायत इथून विविध योजना राबवल्या जातात त्या जनतेसाठी राबवल्या जातात या संपूर्ण कामांचा आढावा या एकपात्री नाटकातून उपस्थित मान्यवरांना देण्यात आला.
यावेळी स्वच्छता अभियान सर्वेक्षण समितीच्या गावाचा संपूर्ण आढावा ग्रामसेवक प्रशांत जाधव,सरपंच,उपसरपंच सदस्य यांच्याकडून घेण्यात आला. यावेळी ग्रामपंचायत ग्रामसेवक जाधव यांनी संपूर्ण गावाची माहिती अतिशय उत्तम प्रकारे उपस्थित अधिकाऱ्यांना दिली. संपूर्ण गावाची पाहणी झाल्यावर सत्कार समारंभाच्या कार्यक्रमा वेळी आढावा बैठकीत मिळालेल्या माहितीनुसार संबंधित अधिकारी संपूर्ण कार्यक्रमावर आनंदित होऊन ग्रामपंचायतच्या पुढील वाटचालीस त्यांनी शुभेच्छा दिल्या एकपात्री नाटकातून बरेचसे काही घेण्यासारखा आहे अशा प्रकारची जनजागृती ग्रामपंचायत सदस्यांकडून जर होत असेल तर निश्चितपणाने येणाऱ्या काळात गाव उज्वल भविष्याकडे जाईल यातील मात्र शंका नाही अशा प्रकारचे उद्गार काढत श्री काळे यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली. या कार्यक्रमाला श्री विजय पाटील जिल्हा कार्यक्रम व्यवस्था कोल्हापूर, श्री अभिषेक पाटील माहिती शिक्षण संवाद तज्ञ कोल्हापूर, श्री संतोष घाडगे, स्वच्छता तज्ञ कोल्हापूर, त्यांच्यासोबत जिल्ह्यातून आलेले श्री संतोष पाटील जिल्हा स्वच्छता अधिकारी, संतोष पवार जिल्हा स्वच्छता अधिकारी,वैभववाडी पंचायत समिती विस्तार अधिकारी श्री हांडे, गावचे सरपंच दीपक चव्हाण ग्रामसेवक प्रशांत जाधव उपसरपंच आनंद जंगम ग्रामपंचायत सदस्य नवलराज काळे, ग्रामपंचायत सदस्य विलास जंगम, ग्रामपंचायत सदस्या रोशनी बाणे, ग्रामपंचायत सदस्या दीक्षा रावराणे, माजी पोलीस पाटील प्रकाश रावराणे, सर्व प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री. कांबळे, शिक्षक कुवर, शिक्षक भैराळे, अंगणवाडी सेविका सौ भावना सावंत, जागृती रावराणे, ग्रामपंचायतचे कर्मचारी सुनील राऊत, पाणी कर्मचारी अशोक पाटील, महात्मा गांधी ग्रामीण रोजगार सेवक सागर मेजारी, कोतवाल मोहन जंगम, मंगेश चव्हाण, केशव रावराणे लंकेश जंगम व इतर शासकीय निमशासकीय कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्रामसेवक प्रशांत जाधव यांनी केले.
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)