ताज्या बातम्या
पाहिजेत..! स्वर्गानंद ट्रॅव्हल्सतर्फे 'दिव्य दत्त परिक्रमा' यात्रेचे आयोजन. महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान.
पत्रकार राकेश परब यांना पर्यावरण मित्र पुरस्कार प्रदान ; अडिच दशके सामाजिक क्षेत्रात देत आहेत सक्रीय योगदान.
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

पत्रकार राकेश परब यांना पर्यावरण मित्र पुरस्कार प्रदान ; अडिच दशके सामाजिक क्षेत्रात देत आहेत सक्रीय योगदान.

प्रकाशन: 08 Jul 2023 04:11 AM
वाचन संख्या 301

सहिष्णू पंडित | उप संपादक : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातल्या बांदा येथील ज्येष्ठ पत्रकार, सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य जागृती क्षेत्रातील क्रियाशील व्यक्ती व पर्यावरण विषयक तळमळ असलेले श्री राकेश परब यांना नुकताच नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था, सिंधुदुर्ग विभाग यांचा ‘पर्यावरण मित्र’ हा सन्मानाचा पुरस्कार प्राप्त झाला. जवळपास अडीच दशके सामाजिक क्षेत्रातील त्यांच्या योगदानाची सर्वच क्षेत्रातून नेहमी प्रशंसा होत असते. आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलचे बांदा प्रतिनिधी तसेच आपली सिंधुनगरी चॅनेल समूहाचे ते स्थापनेपासूनचे महत्वपूर्ण व्यक्ती घटक आहेत.

कुडाळच्या मराठा हाॅल येथे हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी मंचावर कुडाळ तालुका गटशिक्षणाधिकारी संदेश किंजवडेकर, परब मराठा समाजाचे श्री. विनायक परब, पर्यावरण तज्ञ डाॅ. श्री. बापू भोगटे, बापू परब, डिसिल्वा असे मान्यवर उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स