ताज्या बातम्या
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप.
कै.श्रीधर नाईक चौक येथे सी.सी.टी.व्ही. कॅमेरे बसविण्यात यावेत...

कै.श्रीधर नाईक चौक येथे सी.सी.टी.व्ही. कॅमेरे बसविण्यात यावेत...

प्रकाशन: 05 Oct 2021 02:25 PM
वाचन संख्या 177

आमदार नितेश राणे यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक व कणकवली पोलीस निरीक्षक यांना निवेदनाद्वारे केली मागणी…

कणकवली | उमेश परब : कणकवली शहरातील कै. श्रीधर नाईक चौक येथे सी.सी.टी.व्ही. कॅमेरे बसविण्यात यावेत, अशी मागणी आमदार नितेश राणे यांनी मान. जिल्हा पोलिस अधीक्षक व कणकवली पोलीस निरीक्षक यांच्याकडे केली आहे.

याबाबतच्या पत्रात श्री राणे यांनी म्हंटले आहे की २७ ऑगस्ट २०२१ रोजी केंद्रीय सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांच्या जनआशिर्वाद यात्रेच्या वेळी आमच्या राजकीय विरोधकांकडून नरडवे फाटा कणकवली येथील कै. श्रीधर नाईक यांच्या पुतळ्याजवळ अनुचित प्रकार घडवून कणकवली व सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कायदा व सुव्यवस्थेचा मोठा प्रश्न निर्माण झाला असता, असे मला समजते. तरी आपल्या खात्यामार्फत कै. श्रीधर नाईक पुतळ्या जवळच्या परिसरात सी.सी.टी.व्ही. कॅमेरे लवकरात लवकर लावण्यात यावेत. याबाबत निधीची उपलब्धता नसल्यास माझ्या स्थानिक विकास कार्यक्रमा अंतर्गत तरतूद करण्यात येईल. तरी त्वरीत कार्यवाही व्हावी अशी मागणी श्री. राणे यांनी केली आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स