ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
आमदार नितेश राणे यांनी घेतला कणकवली उपजिल्हा रुग्णालयाच्या कारभाराचा आढावा.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

आमदार नितेश राणे यांनी घेतला कणकवली उपजिल्हा रुग्णालयाच्या कारभाराचा आढावा.

प्रकाशन: 30 Jun 2023 09:39 PM
वाचन संख्या 382

वैद्यकीय अधिक्षक डाॅ.धर्माधिकारी यांना केल्या ‘विशेष’ सूचना तर डाॅ. धनंजय रासम यांची उत्तम सेवेबद्दल केली जाहीर प्रशंसा.

कणकवली | गणेश चव्हाण : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवलीच्या उपजिल्हा रुग्णालयात वारंवार भेडसावत असणाऱ्या प्रश्न आणि समस्यांबाबत आढावा घेण्यासाठी सकाळी ८ :३० वाजता कणकवली उपजिल्हा रुग्णालयाला आमदार श्री नितेश राणे यांनी भेट दिली. त्यांनी उपजिल्हा रुग्णालयात वारंवार उद्भवणाऱ्या समस्या आणि बिघाड याबाबत माहिती घेतली. बिघाड झालेल्या यंत्रांबाबत देखील आढावा घेतला व वारंवार गैरहजर असणारे कणकवली उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक डॉ. नागनाथ धर्माधिकारी यांना जाब विचारला. यापुढे कणकवली उपजिल्हा रुग्णालयात अशा प्रकारच्या समस्या उद्भवता कामा नये, कणकवली रुग्णालय सोडून कोणत्याही रुग्णाला इमर्जन्सी व्यतिरिक्त ओरोस,कुडाळ, सावंतवाडीला पाठवू नका अशा सक्त सूचना देखील दिल्या.

उपजिल्हा रुग्णालयात वारंवार रुग्णसेवेत भेडसावणाऱ्या समस्या या यापुढे जाणवता नयेत. काही अडचणी असतील किंवा औषध, स्टाफ कमी पडत असेल तर आम्हाला कळवा आम्ही वरिष्ठ मंत्र्यांशी बोलून याठिकाणी उद्भवणाऱ्या समस्यांचे निवारण करून घेतो असे आश्वासन देखील दिले.

यावेळी हॉस्पिटल स्टाफ ची सेवा योग्य असली पाहिजे व हॉस्पिटल विषयी अयोग्य तथा दिशाभूल करणारी खोटी माहिती ऐकायला आम्ही इथं आलो नाहीत असेही त्यांनी स्पष्टपणे सांगितले. राज्य सरकार कडून आवश्यक गोष्टी हव्या असतील तर सांगा पण इथली वास्तू खराब करायची नाही उलट इथे चांगली रुग्ण सेवा द्यायची मानसिकता ठेवा, ओरोस कुडाळ, सावंतवाडी मध्ये पेशंट जाता नयेत याची काळजी घ्या, बंद असलेल्या ICU विभागाची माहिती घेऊन योग्य ती साधन सामग्री व मशिनरी उपलब्ध करून देऊ असेही त्यांनी सांगितले. नॉर्मल डिलिव्हरी उपजिल्हा रुग्णालयात होत नाही, संबंधित अधिकारी नसतात, पेशंट ओरोस सावंतवाडीला रेफर होतात, प्रत्येकाचे प्रॉब्लेम पेशंट पेक्षा मोठे झालेले आहेत, मी नसेन तर हे चालणार नाही ही मानसिकता बंद करा, अन्यथा बाहेर बोर्ड लावू असेही ठणकावले. डॉ.धर्माधिकारी इथे किती दिवस राहतात, रहाणार, इथल्या पदाला न्याय देणार का यावर आमचे सूक्ष्मपणे लक्ष असून आम्ही वारंवार याचा आढावा घेत राहणार आहोत. इकडची सेवा सुरळीत करायला आम्ही कितीही झटलो तरी तुमची मानसिकता बदलेपर्यंत त्याचा काहीही उपयोग होणार नाही. तुमच्या सांगण्याप्रमाणे तुम्ही हॉस्पिटल सुरळीत चालवत आहात तर का तक्रारी येतात ? दम भरल्यावर तुम्ही इथे राहत आहात आधी सुविधां पेक्षा मानसिकतेत सुधारणा करा, चांगल्या अधिकाऱ्यांचा सत्कार करणारे आम्ही कार्यकर्ते आहोत, असे म्हणत डॉक्टर धनंजय रासम यांचे चांगली सेवा देत असल्याबद्दल अभिनंदन देखील केले.

यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, शहराध्यक्ष अण्णा कोदे, गटनेते संजय कामतेकर, कलमठ सरपंच संदीप मेस्त्री यावेळी उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स