संघर्ष मित्र मंडळ आणि यशस्विनी प्रतिष्ठान यांच्या सौजन्याने मुणगे कारीवणेवाडी येथे अनोखे दातृत्व..!
मसुरे | प्रतिनिधी : सामाजिक क्षेत्रातील सुप्रसिद्ध असे ‘संघर्ष मित्र मंडळ आणि यशस्विनी प्रतिष्ठान’ यांच्या सौजन्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातल्या मुणगे कारीवणेवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना वह्या आणि खाऊ वाटप करण्यात आले.
तसेच कारीवणे ग्रामस्थांना छत्री वाटप करण्यात आले. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कारिवणे येथील शिक्षक श्री सुंदर गराटे यांची बदली झाल्यामुळे त्यांचाही सन्मान करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. हा कार्यक्रम संघर्ष मित्र मंडळ आणि यशस्विनी प्रतिष्ठानच्या सल्लगार, मार्गदर्शक, क्रमांक १ च्या सदस्य सौ.रवीना मालाडकर आणि सौ. देवयानी राणे यांच्या सहकार्याने करण्यात आला. कारीवणे ग्रामस्थांनी दात्यांचे आभार मानले.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)