ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
कणकवलीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे तहसील कार्यालयावर आज संध्याकाळी ४ वाजता काढणार निषेध मोर्चा ; वारकर्यांवरील लाठी हल्ल्याने वातावरण व्यथित.

कणकवलीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे तहसील कार्यालयावर आज संध्याकाळी ४ वाजता काढणार निषेध मोर्चा ; वारकर्यांवरील लाठी हल्ल्याने वातावरण व्यथित.

प्रकाशन: 12 Jun 2023 03:31 PM
वाचन संख्या 133

आ.वैभव नाईक व इतर आघाडीच्या नेत्यांच्या नेतृत्वाखालील या मोर्चात शिवसेना,युवासेना, आघाडीच्या पदाधिकारी व शिवसैनिकांना मोठ्या संख्येने उपस्थित रहायचे आवाहन.

मालवण | सुयोग पंडित : आळंदीत संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीच्या प्रस्थान सोहळ्यासाठी जमलेल्या वारकऱ्यांवर राज्य सरकारच्या पोलिसांनी लाठीहल्ला केला. वारकऱ्यांवर हा हल्ला म्हणजे महाराष्ट्राच्या अस्मितेवरच हल्ला करण्यात आला असून या घटनेच्या निषेधार्थ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आमदार वैभव नाईक, जिल्हाप्रमुख सतीश सावंत, जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांच्या नेतृत्वाखाली कणकवली तहसील कार्यालयावर आज सायंकाळी ४ वाजता निषेध मोर्चा काढून आंदोलन करण्यात येणार आहे असे शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे जाहीर करण्यात आले आहे.

या मोर्चात शिवसेना,युवासेना, आघाडीच्या पदाधिकारी व शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन कणकवली तालुकाप्रमुख शैलेश भोगले यांनी केले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स