बॅ नाथ पै सेवांगण कट्टाच्या वतीने ३८ विद्यार्थ्यांना शिक्षण निधीचे वितरण ; साने गुरुजींच्या पुण्यतिथीचे औचित्य.
विविध प्रबोधनात्मक कार्यक्रमही संपन्न.
मसुरे | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या बॅरिस्टर नाथ पै सेवांगण कट्टाच्या वतीने साने गुरुजींची पुण्यतिथी साजरी झाली. खरा तो एकची धर्म या प्रार्थनेने कार्यक्रमाचा शुभारंभ झाला. प्रारंभी दीपक भोगटे यानी साने गुरुजींना अभिवादन करून सेवांगणचा शिक्षण निधी हा गरीब विधार्थ्यांसाठी उपलब्ध असून गेल्या २५ वर्षात अनेक विद्यार्थ्यांनी याचा लाभ घेतला आहे. विद्यार्थ्यांनी शैक्षणिक आकलनात व गुणवत्ता वाढवावी असे त्यांनी वाहन केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी प्रशासकीय अधिकारी महेंद्र महाभोज यांनी सहज शैलीत साने गुरुजींचा जीवन पट उलगडला. साने गुरुजींच्या विचाराची आज खरी गरज असून सर्वार्थाने जगाला प्रेम अपर्ण करण्याची वेळ आली आहे. द्वेष, वैर विसरून साने गुरुजींचा समतेचा व प्रेमाचा विचार अंगीकृत करूया असे आवाहन त्यानी केले. अदिती शृंगारे यांनी विद्यार्थ्याना शुभेच्छा दिल्या. यावेळी कट्टा दशक्रोशीतील ३८ विद्यार्थ्याना शिक्षण निधीचे वितरण करण्यात आले.
बाळकृष्ण नांदोसकर यानी सूत्रसंचलन व सुजाता पावसकर यानी आभार मानले.यावेळी सेवांगण कट्टा शाखेचे अध्यक्ष किशोर शिरोडकर, माता यशोदा संस्थेचे अध्यक्ष श्रीकृष्ण हरचांदे , नंदकुमार पार्टे, डगरे मॅडम, अदिती शृंगारे, गोंधळी,
पालक व विद्यार्थी उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)