ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
मडुरा पंचक्रोशीत वीज पुरवठा खंडित झाल्यास महावितरणच्या कार्यालयात येऊन घेराव वजा आंदोलन छेडणार ; सामाजिक कार्यकर्ते यशवंत उर्फ तात्या माधव यांचा इशारा.

मडुरा पंचक्रोशीत वीज पुरवठा खंडित झाल्यास महावितरणच्या कार्यालयात येऊन घेराव वजा आंदोलन छेडणार ; सामाजिक कार्यकर्ते यशवंत उर्फ तात्या माधव यांचा इशारा.

प्रकाशन: 11 Jun 2023 07:10 PM
वाचन संख्या 194

कायदा सुव्यवस्था बिघडल्यास याला सर्वस्वी जबाबदार अधिकारीच राहतील असेही केले स्पष्ट.

बांदा | राकेश परब : सिंधुदुर्ग जिल्ह्यात सध्या वीज पुरवठा वीज ग्राहकांना कोणतीही पूर्वकल्पना न देता दुरुस्तीच्या नावाखाली अवेळी खंडित केला जात आहे. मान्सूनपूर्व पावसाच्या हलक्या सरींना सुरुवात झाली अन मडुरा पंचक्रोशीत वीज वितरणचा लपंडाव सुरू झाला. मान्सूनपूर्व कामे न केल्याने तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांचे कामाकडे सोयीस्कर दुर्लक्ष झाल्यामुळे ग्राहकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. जर सलग चार तास वीज पुरवठा खंडित झाल्यास महावितरणच्या कार्यालयात येऊन घेराव वजा आंदोलन छेडणार असल्याचा इशारा मडुरा येथील सामाजिक कार्यकर्ते यशवंत उर्फ तात्या माधव यांनी दिला आहे.

ग्रामीण भागात पाऊस आणि विजेचा लपंडाव हे समीकरण नवीन नाही. बेजबाबदार अधिकाऱ्यांना वरिष्ठ पदावर बसवून ठेवले अन ग्रामीण भागातील सामान्य विज ग्राहकांना अंधारात ठेवले अशी परिस्थिती सद्यस्थितीत मडुरा पंचक्रोशीत सुरू आहे. भरमसाठ वीज बिल आकारणी करून वीज वितरणचा कारभार सुरू असतो. परंतु हजारो, लाखो रुपये मानधन घेणाऱ्या अधिकाऱ्यांचे वीज ग्राहकांच्या समस्यांकडे मात्र सोयीस्कर दुर्लक्ष होते. मान्सूनपूर्वक कामे अद्यापही झालेली नसून याला जबाबदार कोण असा सवाल तात्या माधव यांनी केला.

दरम्यान, मडुरा पंचक्रोशीतील गावात चार तासांच्यावर वीज पुरवठा खंडित झाल्यास ग्रामस्थ व वीज ग्राहकांना घेऊन महावितरणच्या अधिकाऱ्यांना घेराव वजा आंदोलन छेडण्यात येईल. तसेच कायदा सुव्यवस्था बिघडल्यास याला सर्वस्वी जबाबदार अधिकारीच राहतील असा इशाराही तात्या माधव यांनी दिला आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच...

13 Sep 2026 88
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 442

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स