वडिलांच्या सामाजिक सेवेच्या आदर्शांवर चालण्याचा प्रयत्न करतोय : आमदार वैभव विजयराव नाईक.
स्वर्गीय विजयराव नाईक यांचा आठवा स्मृतिदिन ; शिरवल येथील विजयराव नाईक फार्मसी कॉलेज येथे स्व.विजयराव नाईक यांच्या सामाजिक आठवणींना उजाळा.
विजयरावांचे सहकारी संजय पारकर यांच्या हस्ते वृक्षारोपण.
मालवण | सुयोग पंडित : स्व. विजयराव विष्णू नाईक यांचा आठवा स्मृतिदिन आज शिरवल येथील विजयराव नाईक फार्मसी कॉलेज येथे साजरा करण्यात आला. यावेळी त्यांचे चिरंजीव कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक व उद्योजक सतीश नाईक यांच्या हस्ते विजयरावांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहण्यात आली. कॉलेजच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आला. विजयभाऊंचे सहकारी संजय पारकर यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आला.
यावेळी आमदार वैभव नाईक म्हणाले की सर्वसामान्यांच्या अडीअडचणींना धावून जाणार्या विजयराव नाईक यांच्या स्मृती आजही सर्वांच्या स्मरणात आहेत. त्यांच्याबद्दल सर्वांच्याच मनात फार मोठ्या आदराची भावना आहे. त्यांनी समाजसेवेचा जो आदर्श घालून दिला, त्याचप्रमाणे राजकीय, सामाजिक,शैक्षणिक क्षेत्रात त्यांच्या कामाचा वारसा जपण्याच्या प्रयत्न आम्ही करत आहोत असे त्यांनी सांगितले.
यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, संजय पारकर, युवक कल्याण संघ सचिव रमन बाणे, खजिनदार मंदार सावंत, प्राचार्य डॉ. जगताप, नितीन राऊळ, बाबी गुरव,अरुण परब सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)