विशेष सखोल पुनरीक्षण मोहीमेसाठी 'राष्ट्रीय कार्यात माझाही सक्रिय सहभाग' जाणीवेतील दोन प्रेरणास्रोत ; जयेश परब व मंगेश परब.
विशेष सखोल पुनरीक्षण मोहीमेसाठी 'राष्ट्रीय कार्यात माझाही सक्रिय सहभाग' जाणीवेतील दोन प्रेरणास्रोत ; जयेश परब व मंगेश परब.
विशेष | ब्यूरो : विशेष सखोल पुनरीक्षण (SIR-2026) या राष्ट्रीय महत्त्वाच्या मोहिमेत मालवण तालुक्यातील वायंगणी ग्रामपंचायतीचे लिपिक जयेश परब यांनी जिद्द, कर्तव्यनिष्ठा आणि सामाजिक बांधिलकीचा प्रेरणादायी आदर्श घालून दिला आहे. दिव्यांग असूनही केवळ प्रशासकीय जबाबदारीपुरते मर्यादित न राहता, 'या राष्ट्रीय कार्यात माझाही सक्रिय सहभाग असावा,' या जाणीवेतून त्यांनी स्वखुशीने मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) म्हणून जबाबदारी स्वीकारली आहे. सध्या ते मालवण तालुक्यातील वायंगणी येथील मतदान केंद्र क्रमांक २७ वर विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेचे काम करत आहेत.
या मोहीमेतील विविध जबाबदारी व कामांवर सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी तृप्ती धोडमीसे यांचे कडक लक्ष आहे.
याच मोहिमेत मंगेश परब हे देखील सुपरवायझर म्हणून जबाबदारी बजावत आहेत. विशेष म्हणजे, तेही दिव्यांग असून अत्यंत उत्साहाने आणि कर्तव्य भावनेने या राष्ट्रीय उपक्रमात योगदान देत आहेत. राष्ट्रीय कर्तव्याला सर्वोच्च प्राधान्य देत त्यांनी उभा केलेला हे दोन आदर्श समाजासाठी प्रेरणादायी ठरत आहेत, अशी प्रतिक्रिया प्रशासकीय वर्तुळातून व्यक्त होत आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)