ताज्या बातम्या
महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान. साहित्यिक दीपक पटेकर यांना मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान, मुंबईचा सर्वोत्कृष्ट गद्य स्तंभलेखन पुरस्कार प्रदान. मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम २६ ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर.
स्वामी रत्न ठरले अक्कलकोट भूषण नंदकुमार पेडणेकर ; स्वामी भक्तांच्या चैतन्य
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

स्वामी रत्न ठरले अक्कलकोट भूषण नंदकुमार पेडणेकर ; स्वामी भक्तांच्या चैतन्य

प्रकाशन: 24 May 2023 11:39 AM
वाचन संख्या 108

मसुरे | प्रतिनिधी ; श्री.स्वामी समर्थ मठ हडपीड देवगडचे संस्थापक सचिव अक्कलकोट भूषण पुरस्कार प्राप्त श्री.नंदकुमार तुकाराम पेडणेकर याना “स्वामी रत्न पुरस्कार २०२३” घोषित झाला आहे.
समर्थ नगरी अध्यात्मिक राज्यस्तरीय समिती अक्कलकोट या संस्थेने श्री.नंदकुमार तुकाराम पेडणेकर यांच्या धार्मिक व सामाजिक कार्याची दखल घेऊन त्याना राज्यस्तरीय “स्वामीरत्न पुरस्कार २०२३” घोषित केला आहे. दिनांक ३० मे २०२३ रोजी पूणे येथील श्री अण्णाभाऊ साठे सभागृहात, वटवृक्ष देवस्थान अक्कलकोटचे अध्यक्ष श्री.महेशराव कल्याणराव इंगळे आणि चोळप्पा महाराजांचे वंशज वे.शा.सं.श्री.अन्नू गुरुजी यांच्या हस्ते सदर पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
पेडणेकर हे सामाजिक व धार्मिक क्षेत्रात गेली वीस वर्षे उल्लेखनीय कार्य करीत आहेत. त्यांच्या कामाची दखल विविध क्षेत्रात काम करणाऱ्या सामाजिक संस्था कडून घेतली जात आहे. यापूर्वी
हुतात्मा अपंग बहुउद्देशीय विकास कल्याकारी संस्था कराड यांनी त्यांच्या धार्मिक व समाजसेवेची दखल घेऊन त्याना ९ वा राष्ट्रीय अक्कलकोट भूषण हा पुरस्कार २०२२ साली अक्कलकोट येथे प्रदान केला होता. समर्थ नगरी अध्यात्मिक राज्यस्तरीय समिती अक्कलकोट या
सामाजिक संस्थेकडून नंदकुमार पेडणेकर याना स्वामी रत्न पुरस्कार जाहीर झाल्या बद्दल अभिनंदन होत आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स