ताज्या बातम्या
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप.
ओंकार 'नाऊ...!' ( विशेष )

ओंकार 'नाऊ...!' ( विशेष )

ओंकार 'नाऊ...!' ( विशेष )


Article image


ओंकार वैशाली विकास गावकर यांची 'प्रतिष्ठेच्या परीक्षेत' डिस्टींक्शनसह सुवर्णपदकीय कामगिरी.


विविध स्तरातून प्रशंसा. 


विशेष : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणच्या ओंकार वैशाली विकास गावकर याने पुण्यातील एमआयटी कॉलेजमध्ये डिस्टींक्शनसह सुवर्णपदक पटकावले आहे. पुणे येथील नामांकित 'महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी' म्हणजेच एमआयटी कॉलेजचा सिव्हिल इन्फ्रास्ट्रक्चर अँड कन्स्ट्रक्शन विभागाचा निकाल जाहीर झाला आहे. मालवणच्या ओंकार विकास गावकर यांनी महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला आहे. ही परीक्षा अत्यंत प्रतिष्ठेची मानली जाते.  त्यांच्या यशाबद्दल जिल्ह्यातल्या विविध स्तरांतून अभिनंदन होत आहे.  


ओंकार गावकर हे त्यांच्या संपूर्ण शालेय शैक्षणिक जीवनात सदैव विकसनशिल विद्यार्थी म्हणून परिचीत होते. त्यांना इयत्ता दहावीत ९७.६० टक्के गुण प्राप्त झाले होते. त्यानंतर पुणे येथील महाविद्यालयातून त्यांनी प्रथम क्रमांकासह डिप्लोमा पूर्ण केला होता.  


ओंकार गावकर यांचे पालक श्री. विकास गावकर व सौ. वैशाली विकास गावकर यांनी अत्यंत खडतर परिस्थितीचा सामना करत, ओंकार यांच्या बालपणीपासून सर्वांगीण विकसनशिलतेचा आग्रह धरला होता. ओकार यांनी त्यांच्या, पालकांच्या पाल्याप्रती उद्देशांना व कळकळीला नेहमीच 'सुविद्य विनयशीलतेने' प्रतिसाद दिला होता. प्रशालेतील शिक्षणा सोबत ओंकार गावकर यांचा क्रीडा, कला, डिजिटल प्रसारण सेवा असा विविध क्षेत्रातील सक्रीय सहभाग हा एका ग्रामीण भागातील होतकरू पाल्याला विविध यशांनी नटलेला विद्यार्थी अशी ओळख देऊन जात आहे याबद्दल ओंकार वैशाली विकास गावकर यांची विविध स्तरातून मुक्तकंठाने प्रशंसा व अभिनंदन होत आहे. 


ओंकार गांवकर यांनी सतत काहीतरी शिकत व त्यामध्ये दैदीप्यमान यशप्राप्ती करत, 'नाऊ व्हाॅट' किंवा 'आता काय' अशा प्रश्नावर अत्यंत मेहनतीने, अभ्यासूपणे आणि तरिही सहजतेने मात करत स्वतःचे 'ओंकार नाऊ..' असे कालानुरूप अद्यावत व्यक्तिमत्व विकसीत केले आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

लोकप्रिय टॅग्स