ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
फ्लोरेट कॉलेज मुळे फॅशन डिझायनिंग मध्ये नवीन उद्योजक निर्माण होणार : सुप्रसिद्ध अभिनेत्री दिक्षा पुरळकर.

फ्लोरेट कॉलेज मुळे फॅशन डिझायनिंग मध्ये नवीन उद्योजक निर्माण होणार : सुप्रसिद्ध अभिनेत्री दिक्षा पुरळकर.

प्रकाशन: 20 May 2023 05:26 PM
वाचन संख्या 587

२३ मे २०२३ पासून पंधरा दिवसाची नवीन बॅच.

मसुरे | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली येथे फ्लोरेट कॉलेज ऑफ डिजाईनिंग मार्फत ८ मे रोजी पहिली पंधरा दिवसीय मोफत फॅशन डिजाईनिंग बॅच सुरु करण्यात आली होती. ह्या बॅचला सिंधुदुर्ग वासियांकडून चांगला प्रतिसाद लाभला.या कार्यक्रमात प्रमुख पाहुण्या म्हणून सुप्रसिद्ध अभिनेत्री दिक्षा पुरुळकर , श्री. किशोर कदम , कॉलेजच्या मार्गदर्शिका सायली तळवडेकर या उपस्थित होत्या. २५ विद्यार्थ्यांची बॅच यशस्वीरित्या पूर्ण करून दिक्षा पुरळकर यांच्या हस्ते सर्व विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात आले.

बॅचचे विद्यार्थी स्वतः डिजाईन केलेल्या ड्रेस मध्येच कार्यक्रमात सहभागी होत असल्याचा आनंद विद्यार्थ्यांमध्ये दिसत होता. हर्षदा माईनकर, खुशी मालंडकर, पूजा सुतार यांनी आपला अनुभव व्यक्त केला. केवळ १५ दिवसांत खूप काही प्रोफेशनल दर्जाच्या गोष्टी बॅच मध्ये शिकता आल्या व उपक्रमाचा फायदा झाला म्हणून त्यांनी कॉलेजचे आभार मानले.

यावेळी मनोगत व्यक्त करताना पुरळकर मॅडम म्हणाल्या की अशा उपक्रमांचा लाभ सर्वांनी घ्यावा. फॅशन डिजाईन कौशल्य आत्मसात करून प्रत्येकाने छोटासा का होईना रोजगार उभा करावा. तसेच कॉलेजच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. श्री. किशोर कदम यांनी नवीन करिअर संधी म्हणून जुलै २०२३ पासून सुरु होणाऱ्या इंटिरिअर व फॅशन प्रोफेशनल डिप्लोमा – डिग्री कोर्सेस साठी जिल्ह्यातील सर्व दहावी – बारावी विद्यार्थ्याना प्रवेश घेण्यासाठी आवाहन केले आहे. तसेंच कॉलेजच्या व्यवस्थापिका मनीषा देसाई, अधिश्री तिवरेकर व मार्गदर्शक सायली तळवडेकर यांच्या कामाचे कौतुक कले तसेच कणकवली च्या मुलांसाठी २३ मे २०२३ पासून पंधरा दिवसाची नवीन बॅच सुरू करत आहोत . यामध्ये सर्व मुलांनी सहभागी व्हावे असे आव्हान व्यवस्थापक मनीषा देसाई यांनी केले.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स