कशी घडते महिला पत्रकार त्याचा आज होणार उलगडा ; बांद्यात पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरसकर यांच्या सह अनेक मान्यवर असणार उपस्थित..
राकेश परब | सहसंपादक: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील येथील व राज्य पातळीवरच्या ज्येष्ठ व तज्ञ पत्रकार मंगल कामत यांच्या “माझा जीवनप्रवास” या आत्मचरित्रच्या प्रकाशन सोहळ्याचे आयोजन बांदा पत्रकार मित्र परिवाराच्या वतीने आज गुरुवारी दुपारी ३.३० वाजता येथील नट वाचनालयाच्या सभागृहात करण्यात आले आहे.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान बांदा सरपंच प्रियांका नाईक भूषविणार आहेत. यावेळी बांदा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्यामराव काळे, साहित्यिक प्रा. प्रवीण बांदेकर, पत्रकार सीमा मराठे, पत्रकार उमेश तोरसकर, मुख्यमंत्री कार्यालयाचे माजी जनसंपर्क अधिकारी सतीश लळीत, माजी सभापती प्रमोद कामत आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. उपस्थित राहण्याचे आवाहन मंगल कामत यांनी केले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)