कणकवलीत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचे आ. वैभव नाईक व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केले हार्दिक स्वागत.
युवासेना जिल्हा प्रमुख सुशांत नाईक सुद्धा उपस्थित.
कुडाळ | देवेंद्र गावडे ( उपसंपादक) : महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे आज सायंकाळी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर आले. कणकवलीत आमदार वैभव नाईक व शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या वतीने त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले.
यावेळी जिल्हाप्रमुख सतीश सावंत, जिल्हाप्रमुख संदेश पारकर,जिल्हा सहसंपर्क प्रमुख अतुल रावराणे, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक,उपजिल्हा प्रमुख राजू शेटये, महिला जिल्हाप्रमुख जान्हवी सावंत, शैलेश भोगले, रामू विखाळे, उमेश वाळके,प्रमोद मसुरकर,राजू राठोड, उत्तम लोके,निसार शेख, बंडू ठाकूर ,सचिन आचरेकर,संजय पारकर,दिव्या साळगावकर, वैदेही गुडेकर, धनश्री मेस्त्री, संजना कोलते यांच्यासह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)