ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
एक और वर्तमानासकट इतिहास..
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

एक और वर्तमानासकट इतिहास..

प्रकाशन: 19 Apr 2023 06:59 PM
वाचन संख्या 93

कणकवली शहर विकास आराखडा सादरीकरणासाठी शिवसेनेचे अनोखे आंदोलन..!

मालवण | सुयोग पंडित: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली शहर विकास आराखडा सादर करण्याची शिवसेना नगरसेवकांनी वारंवार मागणी करूनही सिंधुदुर्ग नगर रचना विभागाकडून अद्याप पर्यंत आराखडा सादर करण्यात आलेला नाही. मात्र कणकवलीचे उपनगराध्यक्ष काही व्यावसायिकांशी संपर्क करून ज्यांच्या जमिनी ग्रीन झोन मध्ये आहेत त्यांच्या यल्लो झोन करून देण्याचे खात्रीशीररित्या सांगत आहेत.त्यासाठीच हा आराखडा सादर करण्यास विलंब लागत आहे का? असा सवाल करत शिवसेना शहर प्रमुख उमेश वाळके यांनी शिवसेना नगरसेवक सुशांत नाईक व कन्हैया पारकर यांच्या समवेत ओरोस येथील नगर रचना विभागाच्या कार्यालयात धडक देत कणकवलीतील सर्व आराखडा यल्लो करण्यासाठी पिवळा रंग असलेला डबा व ब्रश देऊन अनोखे आंदोलन केले.

   गेल्या काही महिन्यांपूर्वी शहर विकास आराखडा तयार करण्यात आला मात्र अद्याप पर्यंत तो सादर करण्यात आलेला नाही. त्यासाठी शिवसेना नगरसेवकांनी नगर रचना विभागात भेट देऊन लवकरात लवकर शहर विकास आराखडा सादर करण्याची वारंवार मागणी केली. त्यावर अधिकाऱ्यांकडून केवळ तारखा देण्यात आल्या यातील शेवटची तारीख २४ मार्च २०२३ रोजी देण्यात आली होती मात्र त्यालाही आता एक महिना होत आला तरी देखील आराखडा अद्याप सादर केलेला नाही कणकवली नगरीचे उपनगराध्यक्ष काही व्यवसायिकांना फोन करून ज्यांच्या जमिनी ग्रीन झोन मध्ये आहेत त्यांच्या जमिनी येलो झोन करण्याची खात्री देत आहेत. नागवे रोड येथील एक जमीन येल्लो केल्याची माहिती मिळत आहे.आपल्या मर्जीतील व्यक्तींच्या जमिनीबाबत वेगळी भूमिका घेऊन  शहरवासीयांची फसवणूक करण्याचे काम सत्ताधारी नगरसेवक करत असल्याचा आरोप उमेश वाळके यांनी केला असून यासाठीच शहर विकास आराखडा सादर करण्यास विलंब होत आहे का?असा सवाल  उमेश वाळके यांनी याप्रसंगी उपस्थित केला.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच...

13 Sep 2026 89
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 449

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स