ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
विकास कामांसाठी निधीची कमतरता भासणार नाही ; आ.वैभव नाईक यांची ग्वाही..
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

विकास कामांसाठी निधीची कमतरता भासणार नाही ; आ.वैभव नाईक यांची ग्वाही..

प्रकाशन: 23 Apr 2023 08:14 AM
वाचन संख्या 47

मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या आचरा गाऊडवाडी मुख्य रस्ता ते पांगेवाडी कडून स्मशानभूमी मार्गे टेंबली पर्यंत देवगड मालवण रस्त्याला जोडणारा रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे निधी ५ लाख, चिंदर भगवंतगड मुख्य रस्ता ते कातवणकर घाटी पर्यंत जाणारा रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे निधी ६ लाख या कामांची भूमिपूजने तर आचरा कणकवली मुख्य रस्ता ते त्रिंबक बांबरवाडी रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे निधी ५ लाख या कामाचा शुभारंभ आज आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत करण्यात आला. ग्रामस्थांची मागणी असलेले हे रस्ते मंजूर केल्याबद्दल ग्रामस्थांनी आ. वैभव नाईक यांचे आभार मानले. आ. वैभव नाईक यांनी देखील सत्तेत नसलो तरी गावातील विकास कामांसाठी निधीची कमतरता भासणार नाही असे ग्रामस्थांना आश्वासित केले. याप्रसंगी त्रिंबक येथे विभागप्रमुख समीर लब्दे, भाऊ परब, पपू परुळेकर, श्रीकांत बागवे, हरी साटम, स्वप्ना तेली, शेखर घाडी,रोहिदास घाडीगावकर, अविराज परब, सागर चव्हाण,रमेश बाणे, दाजी भाटकर, शेखर घाडीगावकर, सुशांत परब, राकेश गावडे, राजू मेस्त्री, राजू त्रिंबककर, विश्राम मेस्त्री, भूषण गावडे आचरा येथे चंदन पांगे, अनुष्का गावकर, तानाजी पांगे, मोहन पांगे, भाऊ पांगे, कमलाकर पांगे, प्रशांत गावकर, सुरेश गावकर, आबा गावकर, स्वप्नाली तळवडकर, सेजल आचरेकर,रुपेश आमडोस्कर चिंदर येथे विनोद लब्दे, बाळा लब्दे,अमोल मांजरेकर, चारुदत्त लब्दे,प्रवीण लब्दे, पौर्णिमा लब्दे, सरिता लब्दे, पपू माळकर, स्वप्नील मुणगेकर, लीलाधर मुणगेकर, दीपाली लब्दे,दीप्ती लब्दे आदींसह शिवसैनिक व ग्रामस्थ उपस्थित होते.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स