भक्तीचे योगेश देव.., हडपीड स्वामी समर्थ मठ येथे पुण्यतिथी सोहळा भक्तीपूर्ण वातावरणात संपन्न
मसुरे | प्राजक्ता पेडणेकर : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील श्री स्वामी समर्थ भक्त परिवार जोगेश्वरी मुंबई संचालित श्री स्वामी समर्थ मठ हडपीड देवगड येथे मंगळवारी श्री स्वामी समर्थ महाराज पुण्यतिथी सोहळा भक्तीपूर्ण वातावरणात
साजरा करण्यात आला.
सकाळी पादुका पूजन, होमहवन, नाम:स्मरण, सकाळी ११ वाजता पालखी सोहळा,
महाआरती, महाप्रसाद,
सायं ३:०० वाजता नामस्मरण सप्ताहाची सांगता, सायं ५:०० वा सुस्वर भक्तीगीतांचा कार्यक्रम,
रात्रौ ८:०० वा.कलांकुर ग्रुप मालवण निर्मित मराठ मोळा नजराणा आदी कार्यक्रम झाले.स्वामी मूर्ती ला तुळशी पानांची आरास करण्यात आली होती.अध्यक्ष
श्री. प्रभाकर राणे, सचिव तथा अक्कलकोट भूषण
श्री. नंदकुमार पेडणेकर,
श्री स्वामी समर्थ भक्त परिवार जोगेश्वरी मुंबई
संचालित : श्री स्वामी समर्थ मठ हडपीड देवगड कार्यकारी मंडळ (मुंबई) – गाव समिती (हडपीड देवगड) सदस्य उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)