जिल्हा प्रशासनाच्या दुटप्प्या भूमिके विरोधात छेडणार आंदोलन ; नको देवराया अंत असा पाहू.....!
कुडाळ मालवण विधानसभा मतदार संघाचे आमदार वैभव नाईक समतोल…सर्व शुद्ध शिवसैनिकांनी दिला संविधानिक सबुरीचा आदेश.
शुद्ध शिवसेना जिल्हाप्रमुख सतीश सावंत यांचा इशारा.
मालवण | सुयोग पंडित : शुद्ध शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे देवगड जामसंडे नगरपंचायतचे नगरसेवक रोहन खेडेकर यांना अनधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी नगरसेवक पदावरून अपात्र केले.
जिल्हा प्रशासन आणि जिल्हा नगरपालिका प्रशासनाने घाईघाईने कोणाच्या तरी दबावाखाली अवघ्या काही दिवसांच्या कालावधीत हि कारवाई केली. तर दुसरीकडे वाभवे वैभववाडी नगरपंचायत मधील सत्ताधारी नगरसेवक संजय सावंत व सुंदराबाई निकम या दोन नगरसेवकांच्या अनधिकृत बांधकामांची तक्रार १०/०५/२०२२ रोजी वैभववाडी येथील शिवाजी राणे, गजोबार यांनी केली आहे. मात्र त्याला वर्ष होत आले तरी या प्रकरणाची अद्याप पर्यंत एकही तारीख लावण्यात आलेली नाही अथवा कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही.ज्याप्रमाणे अनधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी देवगड नगरसेवकाला अपात्र करण्यात आले तशीच कारवाई वाभवे-वैभववाडी नगरपंचायत मधील सत्ताधारी नगरसेवक संजय सावंत व सुंदराबाई निकम यांच्यावर न झाल्यास देवगड व वैभववाडी येथील नगरसेवकांसमवेत जिल्हा प्रशासन व नगरपालिका प्रशासना विरोधात तीव्र आंदोलन छेडले जाणार असल्याचा इशारा शिवसेना सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख सतीश सावंत यांनी दिला आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)