ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनिष दळवी यांनी मसुरेत शेतकऱ्यांच्या गोठ्यावर जाऊन साधला संवाद.

जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनिष दळवी यांनी मसुरेत शेतकऱ्यांच्या गोठ्यावर जाऊन साधला संवाद.

प्रकाशन: 16 Apr 2023 08:57 PM
वाचन संख्या 283

जिल्हा बँक संचालक बाबा परब, भगीरथ प्रतिष्ठानचे डॉ. प्रसाद देवधर आणि इतर तज्ञांचाही सहभाग.

मसुरे | प्राजक्ता पेडणेकर : सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने वर्षभरापासून जिल्ह्यात प्रतिदिन एक लाख लिटर दूध संकलनाचा संकल्प केला आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील शेतकऱ्यांशी संवाद आणि त्यांना येणाऱ्या समस्या जाणून घेण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी यांनी मालवण तालुक्यातील मसुरे येथील शेतकऱ्यांच्या गोठ्यावर जाऊन भेटी घेतल्या. सुरुवातीला मसुरे येथील पावणाई देवी महिला दूध उत्पादक संस्थेला भेट दिली. यावेळी जिल्हा बँक संचालक बाबा परब, भगीरथ प्रतिष्ठानचे डॉ. प्रसाद देवधर, डॉ. विश्वास साठे, महेश बागवे, जिल्हा बँक मसुरे शाखेचे शाखाधिकारी संतोष गांवकर, गवंडे, पांडुरंग ठाकूर, सिद्धेश मसुरकर, तुळशीदास चव्हाण, अभि घाडीगांवकर, महमद शेख, नारायण परब, जयप्रकाश बांदिवडेकर,  कृष्णा गिरकर, शशांक ठाकूर, जगदीश चव्हाण यासह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.

यावेळी शेतकऱ्यांनी म्हशीसाठी लागणारा सुका चारा कमी दरात मिळावा. त्यांना लागणाऱ्या खाद्याचे पैसे आणि दुधाचे पैसे यात काहीही फायदा होत नाही. शिवाय स्थानिक डॉक्टर असावा, गोठ्यासाठी अडीच लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. जिल्हा बँकेकडून कर्ज मिळावे अशी मागणी शेतकऱ्यांनी केली.

यावेळी बोलताना जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्हा बँकेने जिल्ह्यात प्रतिदिन एक लाख लिटर दूध संकलनाचा संकल्प केला आहे. त्या अनुषंगाने जिल्ह्यात शेतकऱ्यांनी नवीन जनावरे आणली आहेत. अनेक तरुण या व्यवसायात उतरले असून नवनवीन प्रयोग केले आहेत. त्यांच्या समस्या काय आहेत, त्यांच्यासाठी काय योजना आणू शकतो याबाबत यासाठी शेतकऱ्याकडे गेल्याशिवाय, त्यांच्याशी संवाद साधल्याशिवाय  त्यांच्या समस्या समजणार नाहीत. त्यावर जिल्हा बँकेला आपले धोरण आखेल.  शासनाकडून कशी मदत मिळेल यासाठी आपला प्रयत्न आहे. उद्योजकांना सहज कर्ज जिल्हा बँके मार्फत दिले जाते. यापुढील काळात सुद्धा शेतकऱ्यांनी प्रस्ताव केल्यावर लवकरात लवकर कर्ज देण्याबाबत आपले प्रयत्न सुरू असल्याचे मनीष दळवी यांनी सांगितले. यावेळी जिल्हा बँक संचालक बाबा परब यांनीही शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स