ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
मसुरे गांवच्या वैभवी दत्तप्रसाद पेडणेकरची 'बॅक टू बॅक' पुरस्कारांची मालिका सुरुच..!
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

मसुरे गांवच्या वैभवी दत्तप्रसाद पेडणेकरची 'बॅक टू बॅक' पुरस्कारांची मालिका सुरुच..!

प्रकाशन: 15 Apr 2023 06:14 PM
वाचन संख्या 117

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारती शाखा मालवण चा कै.राजेंद्र ठाकूर गुरुजी कलारत्न पुरस्कार जाहीर ; उद्या कट्टा येथे कै.राजेंद्र ठाकूर कलारत्न पुरस्कार होणार प्रदान.

मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या मसुरे गांवची समाज प्रगल्भ कन्या आणि एस एस पी एम कॉलेज कणकवली हरकूळ या इंजिनिअरिंग कॉलेजची कॉम्प्युटर सायन्स ची पहिल्या वर्षाची विद्यार्थिनी कु.वैभवी दत्तप्रसाद पेडणेकर हिची महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारती शाखा मालवणच्या वतीने दरवर्षी दिला जाणारा कै. राजेंद्र ठाकूर गुरुजी कलारत्न पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. उद्या १६ एप्रिलला ओम साई गणेश मंगल कार्यालय कट्टा येथे हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

यावेळी यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सिंधुदुर्ग श्री.राजेंद्र पराडकर, गटविकास अधिकारी पंचायत समिती मालवण श्री आप्पासाहेब गुजर, गटशिक्षणाधिकारी संजय माने, प्राथमिक शिक्षक भरती सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष संतोष पाताडे आणि विविध मान्यवरांच्या उपस्थितीत सदर पुरस्कार वैभवी हिला प्रदान करण्यात येणार आहे.
तिच्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे. नुकताच वैभवी हिला महाराष्ट्र गुणवंत युवती प्रेरणा सन्मान २०२३ हा राज्यस्तरीय पुरस्कार ठाणा येथे मिळाला होता.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स