ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
कृषी पंपाचा वीजपुरवठा खंडीत केल्याने रब्बी पिकांचे नुकसान ; बांदा महावितरणचा अनागोंदी कारभार
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

कृषी पंपाचा वीजपुरवठा खंडीत केल्याने रब्बी पिकांचे नुकसान ; बांदा महावितरणचा अनागोंदी कारभार

प्रकाशन: 14 Apr 2023 09:37 PM
वाचन संख्या 65

बांदा | राकेश परब : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातल्या मडुरा येथे कृषी पंपाचा वीजपुरवठा खंडीत केल्याने बागायतीसह रब्बी पिकांचेही अतोनात नुकसान झाले आहे. वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी गेले ६ महिने वारंवार पाठपुरावा करुनही ‘बांदा महावितरण २’ च्या अधिकार्‍यांनी दुर्लक्ष केले आहे. कुडाळच्या अधीक्षक अभियंता यांचे आश्वासनही हवेत विरले आहे. येत्या चार दिवसांत वीजपुरवठा पूर्ववत न झाल्यास ग्राहक मंचाकडे तक्रार दाखल करण्याचा इशारा शेतकरी शांताराम सावळ यांनी दिला आहे.

मडुरा येथील शेतकरी शांताराम सावळ यांनी सन २०१६ मध्ये कृषीपंपासाठी वीज कनेक्शन घेतले होते. आतापर्यंत त्यांनी सर्व बीलेही भरली आहेत. मात्र, गेले सहा महिन्यांपासून कृषी पंपाचा वीजपुरवठा खंडीत आहे. पाण्याअभावी बागायती करपून गेली आहे. भाजीपाला व रब्बी पिकांचेही नुकसान झाले. यात त्यांचे सुमारे २ लाखांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे बँकेकडून घेतलेले शेतीकर्जही थकले आहे. तसे पत्रही त्यांनी बँकेला दिले आहे.

वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी महावितरणच्या बांदा व सावंतवाडी विभागाकडे पाठपुरावा केला होता. त्यानंतर उपोषण करण्यात आले. त्यावेळी कुडाळचे अधीक्षक अभियंता यांनी वीजपुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, अद्यापपर्यंत कोणतीही कार्यवाही झालेली नाही. येत्या ४ दिवसांत वीजपुरवठा पूर्ववत न झाल्यास ग्राहक मंचाकडे तक्रार दाखल करण्याचा इशारा शेतकरी शांताराम सावळ यांनी दिला आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स