ताज्या बातम्या
स्वर्गानंद ट्रॅव्हल्सतर्फे 'दिव्य दत्त परिक्रमा' यात्रेचे आयोजन. महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान. साहित्यिक दीपक पटेकर यांना मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान, मुंबईचा सर्वोत्कृष्ट गद्य स्तंभलेखन पुरस्कार प्रदान.
सावंतवाडी सार्वजनिक बांधकाम कार्यकारी अभियंता कार्यालयासमोर ग्रामस्थांसह बेमुदत उपोषणाला बसणार ; कास सरपंच प्रवीण पंडित यांचा इशारा.
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

सावंतवाडी सार्वजनिक बांधकाम कार्यकारी अभियंता कार्यालयासमोर ग्रामस्थांसह बेमुदत उपोषणाला बसणार ; कास सरपंच प्रवीण पंडित यांचा इशारा.

प्रकाशन: 14 Apr 2023 10:02 PM
वाचन संख्या 71

बांदा | राकेश परब : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेर्ले-कास रस्त्यावर जीवघेणे खड्डे पडल्याने अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. सदर रस्त्याचा प्रस्ताव मंजुरी करिता पाठविला असून गेले वीस दिवस प्रलंबित आहे. येत्या १९ एप्रिल पर्यंत कामाचा प्रारंभ आदेश न झाल्यास सावंतवाडी सार्वजनिक बांधकाम कार्यकारी अभियंता कार्यालयासमोर ग्रामस्थांसह बेमुदत उपोषणाला बसणार असल्याचा इशारा कास सरपंच प्रवीण पंडित यांनी दिला आहे. पावसाळ्यापूर्वी कास-शेर्ले खड्डेमय रस्त्याचे डांबरीकरण होणे गरजेचे आहे. मात्र यावर कोणतेही कार्यवाही झाली नाही. संबंधित कार्यालयाशी वारंवार पाठपुरावा करूनही दुर्लक्ष होत आहे.

गांवातील नागरिकांना पावसाळ्यात अपघातांसह अनेक समस्यांना सामोरे जावे लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. तारीख १९ एप्रिल पूर्वी कामाचा प्रारंभ आदेश प्राप्त न झाल्यास २० एप्रिल रोजी सकाळी ११ वाजल्यापासून सार्वजनिक बांधकाम विभाग सावंतवाडी कार्यकारी अभियंता यांच्या कार्यालयासमोर कास गावातील नागरिकांसह बेमुदत उपोषणास बसणार असल्याचा इशारा कास सरपंच प्रवीण पंडित यांनी दिला. तसेच यावेळी होणाऱ्या परिणामांची जबाबदारी प्रशासनाची राहील असेही पत्रात नमूद केले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स